Taimur Ali Khan Won Gold Medal In Taekwondo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taimur Ali Khan Won Gold: करीना कपूरच्या ६ वर्षांच्या तैमूरचा विक्रम, जिंकलं गोल्ड मेडल, होतोय कौतुकाचा वर्षाव

Taimur Ali Khan News: करीना कपूर खानचा मोठा मुलगा तैमूर ह्याने गोल्ड मेडल जिंकत आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

Chetan Bodke

Taimur Ali Khan Won Gold Medal In Taekwondo

बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक करीना कपूर खान आणि सैफ अली खान. करीना आणि सैफ अली प्रमाणेच सोशल मीडियावर त्यांचे मुलं तैमूर आणि जेह सुद्धा चर्चेत असतात. कमी वयातच त्यांची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसते. सध्या करीनाचा मोठा मुलगा तैमूर तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतोय. त्या खेळामध्ये तैमूरने सुवर्णपदक जिंकत आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

वयाच्या ६ व्या वर्षीच तैमूरचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा स्पॉट होताना तैमुर पापाराझींवर भडकतो तर बऱ्याचदा त्यांच्यासोबत मस्तीही करताना दिसत आहे. करीना आणि सैफ अलीचा मोठा मुलगा तैमूर अली खान येत्या २० डिसेंबरला ७ वर्षांचा होणार आहे.

इतक्या लहान वयात त्याने एवढी मोठी झेप घेतल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. तैमूर गेल्या अनेक दिवसांपासून तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे. तायक्वांदोमध्ये तैमूरला येल्लो बेल्टही मिळाला आहे. त्याने सुवर्णपदकावर स्वत:चे नाव कोरल्यामुळे सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक होत आहे.

तायक्वांदोच्या वार्षिक स्पर्धेमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी सहभाग घेतला होता. करीना कपूर खान, राणी मुखर्जी, करण जोहरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी करीनाच्या तैमूरसोबत करण जोहरच्या मुलानेही स्पर्धेत बाजी मारली आहे. तैमूर तायक्वांदो खेळून मेडल जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही.

गेल्या वर्षी तैमूरला एका तायक्वांदो स्पर्धेमध्ये, यलो बेल्ट मिळाला होता. त्यावेळी करीनाने सोशल मीडियावरुन तैमुरचे कौतुक केले होते. तैमुर तायक्वांदोसोबत क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ हे खेळ सुद्धा खेळताना दिसतो. त्याचे सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT