MS Dhoni  SAAM TV
मनोरंजन बातम्या

MS Dhoni : एमएस धोनीचा रोमँटिक अंदाज; लवकरच येतोय 'लव्हर बॉय', पाहा VIDEO

Karan Johar Shared MS Dhoni Video : करण जोहरने एमएस धोनीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. त्याच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

आपल्या क्रिकेटने जगाला वेड लावणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार क्रिकेटपटू एमएस धोनी (MS Dhoni) आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. तो कायम पडद्यावर छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसत असतो. त्याला पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. आता धोनी एका नवीन प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्माता करण जोहरने नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

करण जोहरच्या (Karan Johar ) आगामी प्रोजेक्टमध्ये एमएस धोनी 'लव्हर बॉय'ची भूमिका साकारणार आहे. याची हटके झलक करणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. यातून धोनीचा एक नवीन लूक आणि अवतार समोर येणार आहे. करणने शेअर केलेल्या व्हिडीओत क्रिकेटपटू एमएस धोनी रोमँटिक अंदाजात दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीलाच 'पहिल्यांदाच एमएस धोनी रोमँटिक अवतारात' असे लिहिलेले पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये धोनीच्या हातात हार्टच्या आकाराचा फुगा पाहायला मिळत आहे. तो म्हणतो की, "तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक प्रवास सुंदर बनतो. " या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते धोनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत. एमएस धोनी करण जोहरच्या नवीन जाहिरातील दिसणार आहे. याची एक झलक करणन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याआधी देखील धोनीने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. मात्र ही जाहिरात खास असणार आहे. कारण यात धोनीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT