Kapil Sharma New Look Instagram @kapilsharma
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma New Look: कपिल शर्माच्या नवीन लूकनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, नेटकऱ्यांनी कमेंट्स करत उडवली खिल्ली

Kapil Sharma Video: कपिल शर्माने सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Kapil Sharma New Movie New Look:

अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या घरी गणपती बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत केलं होतं. कपिल शर्माचा लाल रंगाचा बाप्पा खूप गोड दिसत होता. विसर्जनाच्या दिवशी कपिल शर्मा आणि त्याच्या कुटुंबीयांनी बाप्पाला मॅचिंग असे लाल रंगाचे कपडे घातले होते.

गणपतीच्या विसर्जनानंतर कपिल शर्मा कामाला लागला आहे. कपिल शर्माने त्याच्या कामाचे अपडेट देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिलने त्याचा लूक चेंज केल्याचे दिसत आहे.

कपिल शर्माने सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा त्याची दाढी करताना दिसत आहे. तर दाढी करताना कपिल त्याच्या हेअर ड्रेसरला 'मी कसा दिसतोय' असं विचारतो. यावर त्याच्या हेअर ड्रेसरला म्हणतो की, 'तुम्ही एकदम इटालियन दिसताय.'

कपिल त्या हेअर ड्रेसरला 'तू इटलीला कधी गेला आहेस का?' असं विचारतो. त्यावर हेअर ड्रेसर म्हणतो की, 'नाही, पण 'हाऊसफुल' चित्रपटामध्ये पाहिलं आहे.' त्यानंतर कपिल नेटकऱ्यांना विचारतो, 'मी कोणत्या देशातील दिसत आहे?' (Celebrity)

कपिल शर्माच्या या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत. कोणी कपिलला डाकूंचा सरदार म्हणत आहे, तर कोणी त्याला हनी सिंगसारखा दिसत असल्याचे म्हणत आहे. तर काही नेटकरी 'हाऊसफुल'चा नेक्स्ट सीजन येणार आहे का? असे विचारत आहेत.

कपिल शर्मा गेले काही दिवसात US आणि दुबईच्या ट्रिप होता. या देशात त्याचे लाईव्ह शो आयोजित करण्यात आले होते. गणेश चतुर्थीच्या आधीच कपिल शर्मा बंगळुरूहून त्याच्या घरी परतला. सध्या कपिल शर्मा शो आणि चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT