Kapil Sharma Reveal Honeymoon Journey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma Reveal Honeymoon Journey: ‘माझ्यासोबत ३७ लोक...’ कपिल शर्माने लग्नाच्या ५ वर्षांनंतर सांगितला हनिमूनचा मजेदार किस्सा

Kapil Sharma News: प्रसिद्ध कॉमेडीस्टार कपिल शर्माने त्याच्या हनिमून दरम्यानचा एक किस्सा शेअर केला.

Chetan Bodke

Kapil Sharma Recalls Memory: प्रसिद्ध कॉमेडीस्टार कपिल शर्मा नेहमीच आपल्या ‘द कपिल शर्मा शो’या शोमुळे चर्चेत असतो. त्याच्या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या प्रमोशन करिता हजेरी लावलीय. नुकताच शनिवारच्या शोमध्ये ‘सत्यप्रेम की कथा’ची टीम शोमध्ये प्रमोशन करिता पोहोचली होती. यावेळी कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, गजराज राव आणि सुप्रिया पाठकने हजेरी लावली होती.

यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्याचा हा खुलासा ऐकून उपस्थितांसह सर्वांनाच हसू आवरलेलं नाही. दरम्यान कपिलने त्याच्या हनिमूनचा किस्सा शेअर केला. 

तो म्हणतो, “मी गंम्मत करत नाहीये, २५ डिसेंबर २०१८ ला माझ्या लग्नाचं रिसेप्शन होतं. रिसेप्शननंतर माझी बायकोची (गिन्नी) बहिण, बहिणीची सासू, माझ्या बहिणी आणि आई आले होते. त्यामुळे आम्ही सर्वांनाच आमच्या सोबत इटलीमध्ये हनिमूनसाठी घेऊन गेलो होतो. आम्ही आमच्या हनिमूनवेळी दोघं जण नाही तर एकूण ३७ लोक होते. पण आम्ही इटलीवरून परतल्यानंतर मुंबईतच खरं तर हनिमून केलं होतं.

कपिल आणि गिन्नी कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना डेट करत होते. कपिल शर्मा आणि गिन्नी छत्राथ १२ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबद्ध झाले. मुलगी अनयरा आणि मुलगा त्रिशान अशी कपिल आणि गिन्नीच्या मुलांची नावे आहेत. अनेकदा कपिल त्याच्या परिवारासोबतचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. 

कियारा आणि कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कियारा आणि कार्तिकने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी कपिलने अनेक अभिनेत्रींना फ्लर्ट करतो तसंच कियाराला देखील त्याने फ्लर्ट केलं. कपिलने नेहमी प्रमाणे कियाराला तिच्या सौंदर्यावरून तिला फ्लर्ट केलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

SCROLL FOR NEXT