Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: 'कंतारा २' ची बंपर कमाई, 'सनी संस्कारी...' ला मोठा झटका; जाणून घ्या कलेक्शन

Box Office Collection Report: 'कांतारा चॅप्टर १' सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. इतर चित्रपट त्यापेक्षा मागे आहेत. शनिवारी सर्व चित्रपटांनी कशी कामगिरी केली ते जाणून घेऊया.

Shruti Vilas Kadam

Box Office Collection Report: सध्या, अनेक चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहेत. ज्यात दक्षिण भारतीय चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' आणि बॉलिवूड चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' यांचा समावेश आहे. यामध्ये 'कांतारा चॅप्टर १' चांगली कमाई करत आहे. जाणून घेऊयात इतर चित्रपटांनी किती कमाई केली.

कांतारा चॅप्टर १

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' ने पहिल्या दिवशी ६१.८५ कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई ४३.६५ कोटी होती. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५५ कोटी कमावले. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण १६२.८५ कोटी कमावले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाची कहाणी आवडत आहे. हा "कांतारा" चा दुसरा भाग आहे.

सनी संस्कारी की तुलसी कुमारी

२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या सनी संस्कारी की तुलसी कुमारीने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ९.२५ कोटींची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५.५ कोटींची कमाई केली. शनिवारी या चित्रपटाने ७.२५ कोटींची कमाई केली, ज्यामुळे एकूण कलेक्शन २२ कोटींवर पोहोचले. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या "कांतारा चॅप्टर १" च्या तुलनेत या चित्रपटाने फारचं कमी कलेक्शन केले आहे.

दे कॉल हिम ओजी

अभिनेता - राजकारणी पवन कल्याण यांच्या "दे कॉल हिम ओजी" चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होऊ लागली आहे. "कांतारा चॅप्टर १" च्या रिलीजमुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ६३.७५ कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात, त्याने १६९.३ कोटींची कमाई केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी चित्रपटाची कमाई अनुक्रमे ४.७५ कोटी आणि ५ कोटी होती. आतापर्यंत एकूण कलेक्शन १७९.०५ कोटींवर पोहोचले आहे.

जॉली एलएलबी ३

अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्लाअभिनीत "जॉली एलएलबी ३" ने १६ व्या दिवशी १.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १०५.९ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई सतत घसरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Winter Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत लोणावळा-खंडाळ्याचा फील घ्यायचाय? मग हे Hidden Spots ठरतील बेस्ट

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Leopard Attack : धक्कादायक! सरपणासाठी गेल्या परत आल्याचं नाहीत, बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान

IND vs SA: गुवाहाटी टेस्टसाठी ऋषभ पंत कर्णधार; गिलची जागा कोण घेणार? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT