Kantara Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: कन्नड चित्रपट कांताराची घोडदौड कायम, बॉक्स ऑफिसवर दिली बॉलिवूड चित्रपटांना मात

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरात चांगली कमाई करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kantara Movie Update: बॉलिवूडचे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल करण्यास अपयशी ठरत आहेत. परंतु दाक्षिणात्य चित्रपट मात्र प्रेक्षकांची मने जिकंण्यात यशस्वी होत आहेत. ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने जगभर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दीड महिना झाला असून चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट अजूनही हाऊस फुल्ल होत आहे. कांतारा हा कन्नड भाषेतील चित्रपट हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट भारताबाहेरही चांगली कमाई करत आहेत.

कांतारा हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगूमध्येही चांगली कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करेल. कांताराने आतापर्यंत हिंदीमध्ये 77.57 कोटी, तमिळमध्ये 8.94 कोटी, तेलगू भाषेत 41.04 कोटी, मल्याळम भाषेत 10.42 कोटी आणि कन्नड भाषेत 154.19 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू असून चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 292.16 कोटींची नेट आणि 338.16 कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. (Movie)

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरात चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 369 कोटींची कमाई केला आहे. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा प्रादेशिक चित्रपट जगभरात प्रसिद्धी मिळविण्यास यशस्वी ठरला आहे. लवकरच हा चित्रपट 400 कोटींचा टप्पा देखील लवकरच पार करेल. (India)

ऋषभ शेट्टीने केवळ या चित्रपटाचे दिग्दर्शनच केले नाही तर या अभिनेत्याने चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनेही जिंकली आहेत. या चित्रपटात ऋषभ शेट्टीशिवाय किशोर, अच्युथ कुमार, प्रमोद शेट्टी आणि सप्तमी गोवदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हॉम्बल फिल्म्सने निर्मित केला आहे, ज्यांनी KGF ची निर्मिती देखील केली होती. (Director)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT