Vaibhav Gupta Won Indian Idol 14 Trophy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Indian Idol 14 Winner: कानपूरच्या वैभव गुप्ताने 'इंडियन आयडल 14'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव, बक्षीस स्वरुपात मिळाली किती रक्कम?

Vaibhav Gupta Won Indian Idol 14 Trophy: रविवारी रात्री मोठ्या धुमधडाक्यात 'इंडियन आयडॉल 14'चा ग्रँड फिनाले पार पडला. कानपूरच्या वैभव गुप्ताने (Vaibhav Gupta) या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

Priya More

Indian Idol 14 Winner Vaibhav Gupta:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'इंडियन आयडल 14'ला विनर मिळाला आहे. रविवारी रात्री मोठ्या धुमधडाक्यात 'इंडियन आयडल 14'चा ग्रँड फिनाले पार पडला. कानपूरच्या वैभव गुप्ताने या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली. या शोच्या ट्रॉफीसोबत वैभव गुप्ताला २५ लाखांचा चेक आणि एक 'हॉट अँड टेक्नी' ब्रेझा कार देण्यात आली. सध्या वैभव गुप्तावर सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकप्रिय टीव्ही शो 'इंडियन आयडल 14'चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. कानपूरच्या वैभव गुप्ता या शोचा विनर ठरला. वैभव गुप्ताला इंडियन आयडल 14 ची चमकदार ट्रॉफी देण्यात आली. यासोबतच वैभवला २५ लाख रुपयांचा चेक आणि बक्षीस म्हणून 'हॉट अँड टेक्नी' ब्रेझा कार देण्यात आली. आद्य मिश्रा, अनन्या पाल, पियुष पनवार, सुभदीप दास, अंजना पद्मनाभन यांच्यासह वैभव गुप्ता पहिल्या सहा स्पर्धकांमध्ये होता. या सहाही स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत झाली. शेवटी या शोची ट्रॉफी जिंकण्यात वैभला यश मिळाले.

शुभदीप आणि पियुष यांना शोमध्ये प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. या दोघांनाही ट्रॉफीसह ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर अनन्या या शोची तिसरी रनर अप ठरली. तिला ट्रॉफीसोबत ३ लाख रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. हा शो हुसैन कुवाजेरवालाने होस्ट केला. विशाल ददलानी या शोमध्ये जज म्हणून परतले. तर हिमेश रेशमिया आणि नेहा कक्करच्या जागी कुमार सानू आणि श्रेया घोषाल यांनी जागा घेतली होती.

या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सोनू निगम स्पेशल जज म्हणून आला होता. त्याच्याशिवाय 'सुपरस्टार सिंगर' या रिॲलिटी शोच्या आगामी सीझनमध्ये 'सुपर जज' म्हणून दिसणारी नेहा कक्कर देखील फिनाले एपिसोडमध्ये सहभागी झाली होती. 'प्यारेलाल सिम्फनी' चॅलेंजसाठी वैभवने 1991 च्या ॲक्शन क्राईम ड्रामा 'हम' मधील 'जुम्मा चुम्मा' हे गाणं गायलं. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

ग्रँड फिनालेमध्ये वैभव गुप्ताने सोनू निगमसोबत 'जोरू का गुलाम' हे शेवटचं गाणं गायलं. ग्रँड फिनालेमध्ये सोनू निगमने विजेत्याची घोषणा केली. शो जिंकल्यानंतर वैभव मीडियाशी बोलताना म्हणाला, 'मी खूप आनंदी आहे आणि ही आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. या शोची ट्रॉफी मी जिंकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला सपोर्ट केला. मला वोट करणाऱ्यांना, या प्रवासात माझा उत्साह वाढवणाऱ्यांचे देखील खूप खूप आभार. आता मला चित्रपटांसाठी गाणं गाण्याची इच्छा आहे. सलमान आणि रणवीर माझे आवडते कलाकार आहेत. त्यांच्यासाठी पार्श्वगायन करण्याचे माझे स्वप्न आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT