Kichcha Sudeepa Instagram @kichchasudeepa
मनोरंजन बातम्या

Kichcha Sudeepa With BJP: खासगी व्हिडीओ व्हायरल करु, भाजप प्रवेशांच्या चर्चेदरम्यान अभिनेता किच्चा सुदीपला धमकी

Kannada Actor Kichcha Sudeepa: किच्चा सुदीपचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल

Pooja Dange

Kichcha Sudeepa Will Join BJP: कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी, लोकप्रिय कन्नड चित्रपट कलाकार किच्चा सुदीप आणि दर्शन तुगुडेपा हे आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश कारण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कलाकार कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका खाजगी हॉटेलमध्ये दुपारी 1:30 आणि 2:30 वाजता पार्टीत प्रवेश करतील.

"कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत दोघेही पक्षात प्रवेश करणार आहेत," असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेली माहितीनुसार किच्चा सुदीपचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल.

किच्चा सुदीपच्या भाजप प्रवेशाआधीचा त्याला धमकी आली आहे. सुदीपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुदीपने म्हटले आहे की, होय, मला धमकीचे पत्र मिळाले आहे आणि ते मला कोणी पाठवले हे मला माहीत आहे. मला माहित आहे की ते फिल्म इंडस्ट्रीतील कोणाकडून तरी आहे. मी त्यांना सडेतोड उत्तर देईन. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्यांच्या बाजूने मी काम करेन.'

सुदीपला धमकीचे पत्र मिळाले आहे. सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर 'अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करू' हे धमकी देणारे पत्र आले आहे. त्यानंतर बेंगळुरूतील पीएस पुट्टेनाहल्ली येथील पोलिसांनी कलम 120 (ब), 506 आणि आयपीसी कलम 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे.

किच्चा सुदीप हा केवळ दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय आहे. 'फुंक' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो सलमान खानच्या दबंग 2 चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

कर्नाटकमध्ये १० मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार असून भाजपची सत्ता टिकून राहण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी कर्नाटकात भाजप पक्षाने पूर्ण बहुमत मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.

किच्चा सुदीप अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. किच्चा सुदीप प्रामुख्याने कन्नड सिनेमात काम करतो. त्याने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुदीपने 1997 मध्ये 'थायव्वा' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि नंतर 'स्पर्श', 'हुच्छा', 'स्वाती मुथू', 'ईगा' सारख्या यशस्वी चित्रपटांद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT