Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : "त्याने पाठलाग केला अन्..."; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर घडलं

Actress Alleges Late Night Harassment : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री घडला भयंकर प्रकार

अनोळख्या व्यक्तीने केला पाठलाग

महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

सिनेविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस कन्नड' फेम अभिनेत्री दिव्या सुरेश हिने बंगळुरूमध्ये तिच्यासोबत घाणेरडे कृत्य झाल्याचा खुलासा केला आहे. तिने या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, रात्री उशिरा बेंगळुरूमध्ये एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग केला आणि अश्लील हावभाव केले.पोस्टमध्ये अभिनेत्रीने घडलेला सर्व प्रकार सांगितला असून, महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

TOI च्या वृत्तानुसार, अभिनेत्री दिव्या सुरेशने पोस्टमध्ये म्हटले की, "आज रात्री ११.३० च्या सुमारास मी आणि माझी चुलत बहीण कारकडे जात असताना एका माणसाने आमचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करत असताना तो उघडपणे स्वतःच्या गुप्तांगाला (प्रायव्हेट पार्ट) स्पर्श करत होता. आमच्या हे लक्षात येताच आम्ही त्याला जाब विचारला, पण तो थांबला नाही. आम्ही कारमध्ये बसेपर्यंत तो तसे करत राहिला..."

अभिनेत्रीने पुढे म्हटले की, "केवळ रात्रीच्या वेळी चालत असल्यामुळे कोणत्याही महिलेला छेडछाडीचा सामना करावा लागू नये..." आपल्या पोस्टमध्ये बेंगळुरू पोलिसांना टॅग करून तिने सार्वजनिक सुरक्षिततेच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले, "आम्हाला दिली जाणारी सुरक्षिततेची आश्वासने नक्की कुठे आहेत?" दिव्याने या घटनेचा एक व्हिडिओही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. अभिनेत्रीच्या या खुलाशाने बेंगळुरूमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत, विशेषतः रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Divya Suresh

दिव्या सुरेश कोण?

अभिनेत्री दिव्या सुरेश 'बिग बॉस कन्नड'च्या आठव्या पर्वात सहभागी होती. 'नान्ना हेंदथी एमबीबीएस' (Nanna Hendthi MBBS) आणि 'जोडी हक्की' (Jodi Hakki) या तिच्या गाजलेल्या कन्नड टीव्ही मालिका आहेत. दिव्या सुरेशने २०१७ मध्ये 'मिस इंडिया साउथ'चा किताब जिंकला होता. अभिनेत्रीने '#९, हिल्टन क्रॉस' (#9, Hilton Cross) या चित्रपटातून पदार्पण केले. तसेच त्यांनी 'रौडी बेबी' (Rowdy Baby), 'केम्पू हलदी हसिरु' (Kempu Haladi Hasiru) आणि 'हिरण्या' (Hiranya) या चित्रपटामध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डाॅल्बी बाबतच्या नियमांचे पालन करा; राज्यमंत्री योगेश कदम यांचे अहवान

Maharashtra Village : भारतातील रहस्यमयी गाव! जेथे घरांना, दुकानांना दरवाजे अन् कुलूप नाही

Video Viral : ना मोठी टीम, ना सरकारी मदत... २० वर्षाच्या एकट्या पोराने नदी केली स्वच्छ

Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून

सरपंचांच्या घरातून १२ तोळे सोनं चोरीला; महिला धुणी-भांडी करत असताना चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT