Kangana Ranaut Wedding Rumors  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Wedding: काय सांगता! कंगना रनौत करतेय लग्न, नवरदेवही शोधला? पत्रिका वाटपाचा कार्यक्रमही सुरू...

Kangana Ranaut Wedding Rumors : बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रनौत लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Chetan Bodke

Kangana New Film Promotion: सध्या सर्वत्रच लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या लग्नगाठ बांधताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रनौत लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरूनती चर्चेत असते. पण सध्या कंगनाचा हा व्हिडीओ पाहून ती तुफान चर्चेत आली आहे.

कंगना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कंगना यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने तिच्याच सोशल मीडिया अकाऊंटवर हा स्वत:च व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे कंगना खरंच लग्न करतेय का?, नवरदेव कोण आहे गं?, लग्नाची तारीख काय? असे अनेक भन्नाट प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

कंगनाने दिली लग्नाची पत्रिका

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक रिपोर्टर कंगानाच्या ऑफिसबाहेर उभा आहे. रिपोर्टर म्हणतो " कंगनाच घर अगदी लग्नघरासारखं सजलं आहे. कंगना लग्न करतेय हे खरं आहे का?" तेवढ्यात कंगना कार मधून येते अनेक पत्रकार तिच्या कार भोवती जमतात आणि तिला विचारतात, "तु लग्न करतेय ही बातमी खरी आहे का? त्यावर कंगना म्हणते,' बातम्या तुम्ही पसरवतात. मी फक्त चांगली बातमी देते.' आणि रिपोर्टरच्या हातात लग्नाची पत्रिका देते आणि ‘लग्नाला यायचं हं’ असं म्हणत आमंत्रण देते.

कंगना लग्न करतेय की प्रमोशन

कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. जिथे तिथे कंगनाच्या लग्नाचीच चर्चा चालू आहे. कंगनाच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण व्हिडिओमध्ये कंगनाने दिलेली लग्नाची पत्रिका ही नक्की कोणाची आहे यावर आता चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. कंगनाने दिलेल्या पत्रिकेवर 'टिकू वेड्स शेरू' असं लिहल आहे. (Bollywood Film)

कंगनाचा आगामी चित्रपट

कंगना या व्हिडिओमधून स्वतः च्या नाही तर टिकू आणि शेरूच्या लग्नाचं आमंत्रण देत आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ हा कंगानाचा आगामी चित्रपट आहे. कंगना रनौत निर्मित चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धिकी आणि अवनीत कौर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. १४ जून रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून येत्या २३ जूनला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे मैदानात

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT