Kangana Ranaut News  saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगनाचा 'हा' चित्रपट फ्लॉप झाल्याचे हे खास कारणं; म्हणते,'चित्रपट फ्लॉप झाल्याने मिळाला धडा'

हिंदी चित्रपट निर्माते पाश्चिमात्य देशांपासून खूप प्रभावित झाले आहेत, कंगना रनौतने स्पष्ट केले मत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut News: अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या 'धाकड' चित्रपटाविषयी मोठा खुलासा केला आहे. कंगनाचे म्हणणे आहे की, स्पाय-थ्रिलरमधील तिची भूमिका कदाचित 'खूप पाश्चात्य' होती त्यामुळे प्रेक्षकांना कनेक्ट करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला.

'मे'मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धाकड' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर निराशाच मिळाली. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप चिपत्रपट ठरला. तसेच कंगनाच्या कारकिर्दीतील सुद्धा हा सर्वात जास्त अपयशी ठरलेला चित्रपट होता. 80 कोटी बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फक्त 3 कोटी रुपयांची कमाई करू शकला.

कंगनाला एका मुलाखती दरम्यान प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता की, बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहेत, तर दाक्षिणात्य चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे. या प्रश्नाचे उत्तर देत कंगना म्हणाली, 'कारण हिंदी चित्रपट भारतीय संस्कृतीपासून दूर गेले आहेत'.

'चित्रपट का चालतो किंवा का चालत नाही याबद्दल विविध प्रकारचे विश्लेषण केले जाते. जर तुम्ही हिट चित्रपट बघितले तर त्या सर्वांची मुळे भारतीय आहेत. कांतारा पाहा. हा चित्रपट भक्ती आणि अध्यात्मावर आधारित आहेत. तसेच या चित्रपटातून भारतातील सूक्ष्म घटकांचे दर्शन देखील घडते. पोन्नियिन सेल्वन-१ मध्ये देखील चोळ साम्राज्याचा इतिहास दाखविला आहे,” असे कंगना म्हणाली. (Movie)

Dhaakad Movie become big Flop at Box Office

कंगनाच्या म्हणण्यानुसार, हिंदी चित्रपट निर्माते पाश्चिमात्य देशांपासून खूप प्रभावित झाले आहेत, म्हणूनच जेव्हा प्रेक्षक बॉलिवूडमधील चित्रपट पाहतात तेव्हा त्यांना डिसकनेक्टेड वाटते. 'बॉलिवूड भारतीय संस्कृतीपासून खूप दूर गेले आहे आणि पाश्चिमात्य बनला आहे. पाशात्य संस्कृतीचा प्रभाव आणि पाश्चात्य चित्रपट बनवण्याच्या ट्रेंडमुळे भारतीय प्रेक्षक चित्रपटापासून दूर जात आहे.' (Kangana Ranaut)

'माझा चित्रपटही या वर्षी चालला नाही. कदाचित लोकांना त्या व्यक्तिरेखेची ओळख पटली नसेल, कारण ती व्यक्तिरेखा खूप पाश्चिमात्य होती', असा धडा मला यातून मिळाला.

कंगना रनौत 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगना दिग्दर्शित 'इमर्जन्सी'मध्ये श्रेयस तळपदे, विशाल नाईक, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि अनुपम खेर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT