Kangana Ranaut Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Angry Reaction : रणबीर कपूर 'दुर्योधन', करण जोहर 'शकुनीमामा' ; कंगना रनौतला इतका राग का येतो?

Kangana Ranaut On Ranbir Kapoor-Karan Johar: कंगना या चित्रपटाच्या संपूर्ण कास्टिंगलाच लक्ष केले असून सगळ्यांना टोमणे मारले आहेत.

Pooja Dange

Kangana Ranaut On Bollywood: अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतंच तिने रणबीर कपूरला ट्विट करता विरोध केला होता. रणबीर नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात रामाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता कंगना या चित्रपटाच्या संपूर्ण कास्टिंगलाच लक्ष केले असून सगळ्यांना टोमणे मारले आहेत.

कंगनाने रणबीर कपूरचे नाव न घेता त्याला पांढरा उंदीर म्हटले होते. कंगनाने पुन्हा एकदा रणबीरला टोला लगावला आहे. तर करण जोहरलाही कंगनाने या टीकेत खेचले आहे.

कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तिने स्टार्सच्या नावांबद्दल हिंट्स देत बरंच काही लिहिलं आहे. अभिनेत्रीने करण जोहरला महाभारतातील शकुनी मामा आणि रणबीर कपूरला दुर्योधन म्हटले आहे. कंगनाचं असं म्हणणं आहे की, ते दोघेही तिच्याबद्दल खूप चुकीचं बोलतात आणि अफवा पसरवतात.

कंगनाने रणबीर आणि करणवर असाही आरोप केला आहे की, जेव्हा तिची आणि हृतिकमध्ये भांडणे सुरू होती तेव्हा दोघेही रेफरी बनून मजा घेत होते. जेव्हा हातात सत्ता येईल तेव्हा या दोघांची बेकायदेशीर कामं बाहेर काढेन, असेही कंगना म्हणाली आहे.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये रणबीर आणि करणबद्दल म्हटले आहे की, जेव्हा तिच्या हाती सत्ता येईल तेव्हा ती डार्क वेब, हेरगिरी आणि हॅकिंगसारख्या अवैध गोष्टींचा उघड करेल. करण जोहर आणि रणबीर कपूर यांनी सुशांत सिंग राजपूतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा दावाही कंगनाने केला आहे.

Kangana Ranaut Instagram Story

दोघांसाठी कंगनाने लिहिले की, तिच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये त्यांची (कारण आणि रणबीरची) ढवळाढवळ सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

कंगनाच्या मते, सोशल मीडियाच्या ताकदीमुळे कोणाचाही आवाज दाबला जाऊ शकत नाही. कंगनाने मीडियावरही अनेक प्रश्न उपस्थित केले. कंगनाने म्हटले आहे की, रणबीर याआधी शिव झाला होता, त्याचा चित्रपट कोणीही पाहिला नाही. आता रणबीर राम बनण्याचा विचार करत आहे. तो रावण आहे. काय कलियुग आहे ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT