Kangana Ranaut - Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut On Movie Mafia : मुव्ही माफियांवर संतापली कंगना रनौत ; म्हणाली माझ्या चित्रपटांचे नुकसान...

Pooja Dange

Tiku Weds Sheru movie review : कंगना रनौतच्या प्रॉडक्शन बॅनर खाली बनलेला पहिला चित्रपट 'टीकू वेड्स शेरू' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहीजण चित्रपटाची प्रशंसा करत आहेत तर काहीजण चित्रपट वाईट असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान कंगना 'मूव्ही माफियां'वर संतापली आहे. तर पोस्ट शेअर करत मूव्ही माफियांना सुनावले आहे.

मूव्ही माफियांकडून चित्रपटाचे नुकसान

कंगना रनौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून दावा केला आहे की, 'मूव्ही माफिया' तिच्या पहिल्या निर्मित चित्रपटाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर कंगनाने तर 'मूव्ही माफिया' तिच्या चित्रपटाविरोधात मोहीम चालवत असल्याचंही लिहिलं आहे.

कंगना तिच्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे की, 'काही लोक मला मेसेज देत आहेत की त्यांना चित्रपटात वापरलेली कविता आवडली आहे. मी तुम्हाला सांगतो, या सर्व कविता मी स्वतः लिहिल्या आहेत.

श्रोत्यांना विनंती

कंगनाने पुढे लिहिले की, 'चित्रपट माफिया माझ्या चित्रपटाचे नुकसान करण्यासाठी सर्व काही करत आहेत. खोटे रिव्ह्युव्ह लिहित आहे. चित्रपटाविरोधात मोहीम सुरू केली. बरं, ते सर्व सोडा. माझा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. तुम्ही स्वतः चित्रपट पाहू शकता किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना चित्रपटाविषयी विचारू शकता. हे खोटे पैसे देऊन केलेले रिव्ह्युव्ह ऐकू नका आणि हो, चित्रपट पाहिल्यानंतर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

कंगना रनौत शेवटची अर्जुन रामपालसोबत 'धाकड' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ती लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील कंगनाचा लूक समोर आला आहे. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या चित्रपटामध्ये कंगना मुख्य भूमिका साकारणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तिनेच केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

Mumbai News : धक्कादायक! प्रसिद्ध हॉटेलकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; ऑनलाइन मागवलेल्या 'बटर चिकन'मध्ये आढळली माशी

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT