Kangana Ranaut: भाजप खासदार कंगना रणौत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. संसदेत विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी करणारे विरोधक आता सरकार चर्चेसाठी तयार असतानाही त्यापासून माघार घेत असल्याचा आरोप कंगना यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले.
कंगना रणौत यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थेट सवाल केला. “तुम्ही चर्चेची मागणी केली होती, मग सरकार चर्चेसाठी तयार असताना आता माघार का घेत आहात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विरोधक संसदेत गोंधळ घालून कामकाज ठप्प करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कंगना यांनी झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील पोलीस लाठीचार्जचा मुद्दाही उपस्थित केला. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि अनियमितता दूर करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ आपल्या भविष्यासाठी पारदर्शक परीक्षा पद्धतीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा काय दोष होता, असा सवाल कंगना यांनी केला. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकार आणि काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तरुणांच्या हक्कांबाबत बोलणारे विरोधक आपल्या आघाडीतील सरकार असलेल्या राज्यात विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यानंतर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला.
संसदेतील बोलताना कंगना यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. सुरुवातीला विरोधकांनी विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली होती. मात्र, आता सरकार चर्चेसाठी तयार असूनही विरोधक सहभागी होत नसल्याचे त्या म्हणाल्या. कंगना यांनी यापूर्वी जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरूनही वादग्रस्त विधान केले होते. आंदोलक विद्यार्थ्यांना ‘जनरेशन गटर’ असे म्हटल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.