Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : रणबीरच नाही तर सलमानसोबत काम करायला कंगनाचा नकार, स्वत:च सांगितलं कारण!

Kangana Ranaut Emergency Promotion : कंगना रणौत सध्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान, कंगनाने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केलाय.

Manasvi Choudhary

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या काही दिवसांत कंगना रणौत (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. कंगना रणौतच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबाबत एकएक अपडेट जाणू घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

कंगना रणौत सध्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान, कंगनाने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केलाय. कंगनाने सांगितले की, याआधी मला रणबीर कपूरच्या 'संजू' आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात काम करण्याची संधी आली होती. पण ती मी नाकारली.

सलमान खानने कंगनाला फोन करून 'बजरंगी भाईजान' चित्रपटात काम करण्याबद्दल विचारणा केली होती. 'पण मला वाटलं काय भूमिका असेल? यामुळे मी ती ऑफर नाकारली', असल्याचे कंगनाने सांगितले. याशिवाय 'सुलतान' चित्रपटाच्यावेळी देखील सलमानने माझ्याशी संपर्क केला असल्याचे तिने सांगितले. पुढे सलमानने मला विचारले की, 'आता मी तुला आणखी काय ऑफर करू?'

कंगनाने पुढे सांगितले की, 'सलमान माझा खूप जवळचा मित्र आहे. तो नेहमी माझ्या संपर्कात असतो. 'इमर्जन्'सी चित्रपटाबाबतही त्याने मला सांगितले की मला हा चित्रपट बघायचा आहे. त्याने आमच्या एका कॉमन फ्रेंडला चित्रपट पाहण्यासाठी सांगितलं. मी त्या मित्राला हा चित्रपट दाखवला. सलमानने मला फोन करून चित्रपटाविषयी सांगितले.' दरम्यान, कंगनाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT