Kangana Ranaut Reacts To Report Of Kissing Vir Das Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut On Kissing Controvery: 'रिव्हॉल्व्हर रानी'तील 'त्या' सीनवर कंगना रनौतचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘हृतिक रोशननंतर...'

Kangana Ranaut And Vir Das Kissing Scene: अभिनेत्रीने एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut Reacts To Report Of Kissing Vir Das

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. सध्या कंगना रनौत आगामी चित्रपटामुळे चर्चेत असून तिने गेल्या काही दिवसांपूर्वी ‘तेजस’ चित्रपटाबद्दल अपडेट शेअर केली होती.

अलिकडेच अभिनेत्रीने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटामध्ये कंगनाने अभिनेता वीर दाससोबत असं किसींग केलं, ज्यामुळे अभिनेता वीर दासच्या ओठातून रक्त आलं होतं. चित्रपटातील त्याच सीनची आठवण करून देत अभिनेत्रीने तिच्या स्टोरीच्या माध्यमातून हृतिक रोशनचं नाव घेतलं आहे.

शेअर केलेल्या एका मीडिया रिपोर्टमध्ये, कंगनाच्या ‘रिव्हॉल्व्हर रानी’ चित्रपटातील किसबद्दल लिहिण्यात आले होते. कंगना रनौतने त्या मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कॅप्शन दिले, “हृतिक रोशननंतर मी गरीब वीर दासची इज्जत लुटली? हे कधी घडले?” आणि पुढे हसण्याचे इमोजी ही शेअर केले. २०१६-१७मध्ये हृतिक आणि कंगना यांच्यात जोरदार वाद झाला होता. इतकंच नाही तर त्यावेळी दोघांमध्ये कायदेशीर वादही झाला होता. दोघांच्याही रिलेशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती, त्या अफवा हृतिकने नेहमीच धुडकावल्या होत्या.

कंगनाच्या ‘रिव्हॉल्वर राणी’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कंगना आणि वीर दास हे दोघेही प्रमुख भूमिकेत होते. या क्राईम कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन साई कबीर यांनी केले होते. कंगना आणि वीर दाससोबतच प्रमुख भूमिकेत पियुष मिश्रा, झाकीर हुसेन आणि पंकज सारस्वत हे कलाकारही होते. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली व्यंगात्मक प्रेमकथा चित्रित करण्यात आली होती.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. बहुचर्चित ‘इमर्जन्सी’मध्ये कंगनाने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कंगनासोबत अनेक दिग्गज सेलिब्रिटींची फौज दिसणार आहे. याशिवाय लवकरच कंगना ‘तेजस’मध्येही दिसणार असून तिच्या डॅशिंग लूकची तुफान चर्चा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT