Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: भाजप खासदार कंगणा रणौत यांची हायकोर्टात धाव, अश्लील एआय कंटेंटबाबत काय म्हणाल्या?

Kangana Ranaut: कंगना रणौत यांनी AIद्वारे तयार केलेली अश्लील आणि बनावट कंटेंट हटवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रतिवादींना समन्स बजावले असून अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्या नावाने इंटरनेटवर पब्लिश होत असलेली अश्लील आणि AIच्या मदतीने तयार केलेल्या व्हिडिओंना हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशा प्रकारच्या कंटेंटमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असून, व्यक्तिमत्त्व अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे कंगना यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.

कंगना यांच्या वतीने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी ऑनलाइन पब्लिश होत असलेल्या अश्लील AI व्हिडिओ आणि स्टेटमेंटवर आळा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. कंगना यांच्या नावाने चुकीचे कंटेंट आणि माहिती इंटरनेटवर पसरवली जात असल्याचे त्यांच्या लीगल टीमने न्यायालयाला सांगितले.

अश्लील आणि बनावट कंटेंट हटवण्याची मागणी

कंगना यांच्या वकिलांनी स्पष्ट केले की, 'सध्या न्यायालयाकडे आम्ही केवळ अश्लील आणि बनावट ऑनलाइन कंटेंट हटवण्याची मागणी केली आहे. कंगना यांच्याशी संबंधित मीम्स किंवा पोस्टविरोधात कोणत्याही आमच्या मागण्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक प्रकारच्या कंटेंटवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली नाही.

दिल्ली हायकोर्टाची विचारणा

न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठाने कंगना यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, ज्यांच्या विरोधात हा अक्षेपार्ह कंटेंट हटवण्याचे आदेश मागितला आहे, त्या व्यक्ती कोण आहे? अशी विचारणा केली. तसेच, अभिनेत्रीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अंतरिम स्थगितीच्या अर्जाबाबतही खंडपीठाने नोटीस जारी केली. हा प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ३ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार आहे.

कंगनापूर्वी अनेक सेलिब्रिटी कोर्टात

AI आणि डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गैरवापराविरोधात न्यायालयात जाणारी कंगना रणौत या पहिली सेलिब्रिटी नाही. ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, पवन कल्याण, श्री श्री रविशंकर, राज शमानी आणि अभिषेक शर्मा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारला आहे.

Maharashtra News Live Update: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

Vastu Tips: घरात दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं शुभ की अशुभ? वाचा वास्तूशास्त्राचा नियम नेमकं काय सांगतो

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? महत्वाची अपडेट समोर

Maharashtra Epstein Files: अशोक खरातची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता! 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'मधील गूढ उकललं

Breaking News : मोठी बातमी! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही ठरली, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT