Emergency Saam TV
मनोरंजन बातम्या

kangana ranaut : खासदार कंगना रणौत यांना मोठा दिलासा; सेन्सॉर 'इमर्जन्सी'ला मिळाला ग्रीन सिग्नल, आता पडद्यावर कधी झळकणार?

kangana ranaut emergency movie : खासदार कंगना रणौत यांना मोठा दिलासा मिळालाय. कंगना यांच्या 'इमर्जन्सी' सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळालाय.

Vishal Gangurde

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री , खासदार कंगना रणौत यांच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून क्लिनचिट मिळाली आहे. यामुळे कंगना यांचा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाने कंगना यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कंगना यांचा 'इमर्जन्सी' सिनेमा वादात सापडला होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देत कंगना यांना दिलासा दिला आहे. यानंतर अभिनेत्री कंगना यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, 'मला सांगताना आनंद होत आहे की, माझ्या इमर्जन्सी सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आहे. आम्ही लवकरच सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करू. तुमच्या पाठिंब्यासाठी आभारी आहे'.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कंगना रणौत यांचा सिनेमा ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, या सिनेमा शिख संघटनांनी विरोध केला. सिनेमाला विरोध वाढल्यानंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. शिख समाजाचा आरोप आहे की, सिनेमात त्यांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. या सिनेमाचा १४ ऑगस्ट रोजी ट्रेलर आला होता. मात्र त्यानंतर या सिनेमावरून वाद निर्माण झाला होता. पंजाबमध्ये या सिनेमाच्या विरोधात आंदोलन झालं होतं. या आंदोलनात त्यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

सेन्सॉर बोर्डाने कंगना यांच्या सिनेमाला सर्टिफिकेट दिलं होतं. मात्र, सिख समाजाच्या विरोधानंतर वातावरण तापलं. या सिनेमाच्या विरोधात मध्य प्रदेश हायकोर्टात देखील याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने निर्मात्यांना सर्टिफिकेट दिल नसल्याचं सांगण्यात आलं. यावेळी कोर्टाने सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देण्याआधी सिख समाजाच्या आक्षेपावर लक्ष द्यावे.

दुसरीकडे निर्मात्यांनीही कोर्टात बाजू मांडली. सिनेमाला सर्टिफिकेट न मिळाल्यानंतर निर्मात्यांनी मुंबई हायकोर्टात दरवाजा ठोठावला होता. सेन्सॉर बोर्डाने एक समितीची स्थापना केली. त्यानंतर सिनेमात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. तसेच निर्मात्यांना सिनेमात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ऐतिहासिक मुद्यांवर डिस्क्लेमर लावण्याचे आदेश दिले आहेत.

या सिनेमात कंगना रणौत या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहेत. तसेच त्या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्या देखील आहेत. तसेच सिनेमात अनुपन खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी सारखे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT