Kangana Ranaut compare herself with legendary singer Lata Mangeshkar  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौत पुन्हा चर्चेत; लता मंगेशकर यांच्याशी केली स्वतःची थेट तुलना

कंगना रनौतने व्हिडिओ शेअर करत दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे कौतुक केले आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut Compare herself with Late Lata Mangeshkar: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या स्पष्ट आणि निर्भीड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना नेहमी तिच्या मनाला जे पटेल तेच करते. यामुळे तिला अनेकदा टीकांचाही सामना करावा लागला आहे. कंगनाने लग्न समारंभात डान्स करण्याविषयी तिचे मत मांडले आहे. तसेच त्याबाबत एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आशा भोसले दिवंगत गायिका आणि त्यांची बहीण लता मंगेशकर यांच्याविषयी सांगत आहेत. आशा भोसले यांनी लग्नसमारंभात परफॉर्म केले नाही याविषयी त्या सांगत आहे. तसेच त्यांना कधीही पैशाचा लोभ नव्हता, असे सुद्धा आशा भोसले म्हटल्या आहेत. कंगना रनौतने हा व्हिडिओ शेअर करत दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे कौतुक केले आहे. (Lata Mangeshkar)

व्हिडिओमध्ये, आशा भोसले सांगत आहेत की त्यांची मोठी बहीण आणि दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना एकदा लग्नात गाण्यासाठी दशलक्ष डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती ऑफर नाकारली. त्यांना फक्त दोन तासासाठी त्या समारंभाराला यायचे आहे, असे सांगण्यात आले होते. पण लताजींनी त्यांना नकार दिला.

आता कंगना रनौतने स्वतःची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली आहे. कंगनाने तिच्या स्टोरीवरील कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “सहमत!!! माझ्याकडे सर्वाधिक लोकप्रिय गाणी असूनही मी लग्नात किंवा प्रायव्हेट पार्ट्यांमध्ये कधीच नाचलो नाही.. इतके पैसे मिळत होते पण नाकारले. हा व्हिडिओ पाहून आनंद झाला. लताजी खरंच खूप प्रेरणादायी आहेत."

Kangana Ranaut Instagram Story

कंगना दिग्दर्शित 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ज्यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगनाने या चित्रपटातील सर्व पात्रांचे लूक आधीच उघड केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT