Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली, बॉलिवूड पाकिस्तानची प्रेमकहाणी कधी संपणार?

Kangana Ranaut: नसीरुद्दीन शाहांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील वक्तव्यावर कंगना रणौतने पलटवार केला. बॉलिवूडच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत पाकिस्तान, झारखंड आणि पीएम मोदींचा मुद्दा मांडला.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut: विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मौनावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांना सोशल मीडिया पोस्टमधून ‘कोल्हा’ म्हटल्यानंतर कंगना यांनी आता आपण त्यांच्यावर टीका का केली, याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी कंगना यांनी बॉलिवूडमधील पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला.

‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी शैक्षणिक सुधारणांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बॉलिवूड सेलिब्रिटींनी जाहीर पाठिंबा का दिला नाही, यावर भाष्य केले होते. सेलिब्रिटी स्वतःच्या अंतर्मनाला योग्य वाटेल तेव्हाच भूमिका घेतील, असे म्हणत त्यांनी कलाकारांच्या मौनावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

या वक्तव्यानंतर कंगना रणौतने सोशल मीडिया पोस्टमधून नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला होता. नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे ‘कोल्हे’ म्हणवून घेण्यापेक्षा स्वतःला ‘कुत्रा’ म्हणवून घेणे पसंत करेन, असे तिने म्हटले होते. तसेच भारतात राहून शेजारील देशाची बाजू घेत असल्याचा आरोपही तिने केला होता.

आता आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना कंगनाने नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यांचाही संदर्भ दिला. पंतप्रधान हे देशाचे जागतिक स्तरावरील प्रतिनिधी असल्याचे सांगत, त्यांच्याबाबत अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे कंगनाने म्हटले.

कंगनाने यावेळी बॉलिवूड आणि पाकिस्तान यांच्यातील ‘प्रेमकहाणी’वरही सवाल उपस्थित केला. ती म्हणाली, " बॉलिवूडचे चित्रपट असोत, त्यांची विधाने असोत किंवा मुलाखती बॉलिवूड आणि पाकिस्तान यांच्यातील हे प्रेमप्रकरण नक्की कधी संपणार? ते पाकिस्तानच्या पूर्णपणे प्रेमात पडलेले दिसतात. मला हे जाणून घ्यायचे आहे की फाळणी होऊन इतकी वर्षे उलटूनही ही प्रेमकथा का संपत नाहीये? विशेषतः इतक्या घटना घडूनही मग तो पहलगामवरील हल्ला असो किंवा 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान झालेली कारवाई. देश एका वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे आणि शेजारील देशाबाबत नागरिकांचा दृष्टिकोन व संघर्ष वेगळा आहे; अशा परिस्थितीत, पाकिस्तानसोबतची बॉलीवूडची ही प्रेमकथा कधीतरी संपेल का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT