Kalam: The Missile Man of India Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kalam: The Missile Man of India: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा; 'हा' सुपरस्टार साकारणार भूमिका

Kalam: The Missile Man of India Movie: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे.

Shruti Vilas Kadam

Kalam: The Missile Man of India Movie: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे, जो भारताचे माजी राष्ट्रपती आणि 'मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे. या बायोपिकमध्ये तमिळ सुपरस्टार धनुष प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही घोषणा 78व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आली, जिथे चित्रपटाचे शीर्षक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले.

चित्रपटाचे नाव 'कलाम: द मिसाइल मॅन ऑफ इंडिया' असे असून, डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे चित्रण करण्यात येणार आहे. रामेश्वरमच्या लहानशा गावातून ते राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास, त्यांची वैज्ञानिक कामगिरी, आणि राष्ट्रसेवेतील योगदान या सर्व गोष्टींचा समावेश या चित्रपटात असेल. निर्मात्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील सत्यता आणि गरिमा जपण्यासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे .

चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि ए.के. एंटरटेनमेंट्स आहेत. 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात 'जनतेचे राष्ट्रपती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. कलाम यांच्या ज्ञान, विनम्रता आणि राष्ट्रसेवेच्या भावना यांचे चित्रण करण्यात येणार आहे. नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले पोस्टर त्यांच्या दृढनिश्चय, नवोन्मेष आणि देशभक्तीच्या भावनांना समर्पित दृश्यात्मक श्रद्धांजली आहे .

ओम राऊतचा 'आदिपुरुष' नंतरचा पहिला चित्रपट आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यामुळे 'कलाम' या बायोपिककडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. धनुषसारख्या प्रतिभावान अभिनेत्याच्या माध्यमातून डॉ. कलाम यांचे जीवन मोठ्या पडद्यावर पाहणे ही एक प्रेरणादायी अनुभव ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

Goodluck Cafe: 'गुडलक' कॅफेचे पुन्हा 'बॅड लक'; आता अंडा भूर्जीमध्ये आढळलं झुरळ

Manikrao Kokate: कृषीमंत्री पुन्हा बरळले, 'शासन भिकारी' मुख्यमंत्र्यांची कोकाटेंना तंबी

Maharashtra Politics : बटन दाबलं की दिल्ली हादरेल, भाजपमध्ये भूकंप येईल, मग दाबा बटन; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान

Second Hand Phone: सेंकड हँड मोबाईल घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल पश्चाताप

SCROLL FOR NEXT