Maa Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maa Box Office Collection : काजोलचा 'माँ' फ्लॉप की हिट? चौथ्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maa Box Office Collection Day 4 : काजोलच्या 'माँ' चित्रपटाने ४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घेऊयात. या चित्रपटात आई-मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे.

Shreya Maskar

'माँ' (Maa) चित्रपट रिलीज होऊन आता चार दिवस झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये संथ सुरूवात केली आहे. मात्र वीकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली. 'माँ'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol ) मुख्य भूमिकेत दिसत आहे. 'माँ' चित्रपटात आई-मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे. 'माँ' चित्रपट 27 जून 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'माँ' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'माँ' चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. वीकेंडला कलेक्शनच्या आकड्यात वाढ झालेली पाहायला मिळाली. शनिवारी 6 कोटी आणि 6.75 कोटी रुपयांची कमाई केली. 'माँ'च्या चौथ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काजोलच्या 'माँ' चित्रपटाने चौथा दिवशी 2.25 कोटी रुपये कमावले आहे. एकूण कलेक्शन 19.90 कोटी रुपये आहे.

  • पहिला दिवस - 4.65 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 6 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 6.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस- 2.25 कोटी रुपये

  • एकूण - 19.90 कोटी रुपये

'माँ' हॉरर चित्रपट आहे. यात राक्षस आणि देवी काली मातेची कथा सांगितली आहे. चित्रपटात खलनायकाची भूमिकेत रोनित रॉय दिसत आहे. याशिवाय चित्रपटात इंद्रनील सेनगुप्ता पाहायला मिळाला आहे. 'माँ' चित्रपटातील गाणी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा थरारक अवतार; O Romeo चं फर्स्ट लूक पोस्टर पाहून अंगावर येईल काटा, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Poha Chakali Recipe : वाटीभर पोह्यांची करा कुरकुरीत चकली, १५ मिनिटांत चटपटीत स्नॅक्स तयार

Ladki Bahin Yojana: मकरसंक्रांतीला लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार; पण 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT