Maa  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maa OTT Release: थिएटरनंतर काजोलचा 'माँ' ओटीटीवर होणार प्रदर्शित; हा हॉरर चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Maa OTT Release: काजोलचा 'माँ' हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

काजोलचा 'मा' हा चित्रपट एक हॉरर थ्रिलर आहे

मा' या ओटीटीवर प्रदर्शित होणार

काजोल व्यतिरिक्त कलाकार

Maa OTT Release: वीकेंड येणार आहे आणि नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यात थिएटरमध्ये फारशी गर्दी नसेल, पण ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटीवर एकामागून एक चित्रपट आणि सिरीज प्रदर्शित होणार आहेत. या यादीत एक हॉरर थ्रिलर चित्रपट देखील आहे हा चित्रपट म्हणजे काजोलचा 'माँ' चित्रपट.

काजोलचा 'माँ' हा हॉरर थ्रिलर चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. अलीकडेच चित्रपटाची ओटीटी रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'माँ' चित्रपट कोणत्या ओटीटीवर प्रदर्शित होत आहे?

विशाल फुरिया दिग्दर्शित 'माँ' हा चित्रपट दोन महिन्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक बऱ्याच काळापासून चित्रपटाच्या ऑनलाइन स्ट्रीमिंगची वाट पाहत होते. आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार हे जाहीर करण्यात आले आहे. २१ ऑगस्ट रोजी, इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "जेव्हा रक्षणकर्ता आई असेल तेव्हा प्रत्येक शिकारीचा पराभव होईल."

काजोलचा 'माँ' हा चित्रपट २२ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा २ तास १३ मिनिटांचा चित्रपट भयपट आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील दमदार आहे. 'माँ' हा चित्रपट ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता पण या चित्रपटाने ३५ कोटींची कमाई केली आहे. काजोल व्यतिरिक्त, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, दिव्येंदु भट्टाचार्य आणि सुरजशिखा दास यांसारखे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT