Manasvi Choudhary
रात्री कपडे धुवावेत की नाही हा प्रश्न सर्वंच महिलांना पडतो. अनेक महिलांना कामाच्या धावपळीत रात्री कपडे धुण्याची सवय असते मात्र हे चुकीचे आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे अशुभ मानले जाते.
रात्रीच्या वेळेस कपडे धुतल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, रात्रीची वेळ नकारात्मक ऊर्जेची मानली जाते अशा वातावरणात नकारात्मक शक्ती असल्याने रात्री कपडे धुणे टाळावे.
सूर्यास्तानंतर रात्री कपडे धुतल्याने वास्तुदोष निर्माण होतो आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
रात्री कपडे धुतल्याने आणि वाळत घातल्याने कपड्यातील जंतू आणि बुरशी वाढण्याची शक्यता अधिक असते.
सूर्यास्तानंतर कपडे धुणे आणि उघड्यावर वाळणे हे अत्यंत चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, सकाळची वेळ ही कपडे धुण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.