Kajol Deleted Post On Social Media Saam TV
मनोरंजन बातम्या

Kajol Takes Break From Social Media: मी कठीण काळातून जात आहे... पोस्ट शेअर करत काजोलचा सोशल मीडियाला रामराम

Kajol Devgan Quits Social Media: काजोलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Kajol Deleted Posts On Social Media: काजोल ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची नेहमीच मन जिंकत आली आहे. काजोल प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असते. काजोल ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. काजोलने आयुष्यातील कठीण काळाला सामोरी जात आहे, अशी पोस्ट करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

काजोल ही नेहमीच तिच्या बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाने साऱ्यांचे तिच्या प्रेमात पाडते. तिच्या अभिनयावर लोक आजही खूप प्रेम करतात. काजोलच्या 'सलाम वेंकी' या चित्रपटाने तर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं. (Latest Entertainment News)

काजोल सामना करतेय कठीण काळाचा

काजोल नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करताना दिसत असते. तिच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय बनतात. तिच्या इन्स्टाग्रामवरुन नेहमी काहीतरी कॉमेडी व्हिडिओ शेअर करताना दिसते. पण आता तिच्या या पोस्टमुळे नेटकरी चकित झाले आहेत.

काजोलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलयं की, मी माझ्या आयुष्यातील कठीण काळाचा सामना करत आहे. या पोस्टमुळे एक वेगळीच चर्चा सध्या सुरू आहे. तिने या पोस्टखाली कॅप्शनही लिहल आहे की, सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिची काळजी वाटत आहे.

काजोल ही नेहमी आनंदी असते. तशाच पोस्टही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पण अचानक ही सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याच्या पोस्टने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावरुन ब्रेक की प्रमोशन

सोशन मीडियावरुन कजोलने तिचे सर्व फोटोजही डिलीट केले आहेत. तिच्या अकाउंटवर फक्त एकच पोस्ट दिसत आहे. त्याच पोस्टमुळे तिच्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात येत आहे. काळजी बरोबरच काही लोक हे एक प्रमोशन आहे असेही म्हणत आहेत. काजोलने तिची नवीन वेबसीरीज 'द गुड वाइफ'च्या प्रमोशनसाठी अशी पोस्ट केल्याचे म्हटले जाते. अनेकांनी कॅप्शनमध्ये तिच्याबद्दची काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी हे प्रमोशन असल्याचे म्हटले आहे.

काजोलबद्दल सांगायचं झालं तर काजोलचा नवीन वेबसीरीज 'द गुड वाइफ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'लस्ट स्टोरीजं २' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Elections: विधानसभाआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; हायकोर्टाचे 3 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश

Maharashtra News Live Update: शेतकऱ्याची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या

IAS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ११ जिल्ह्यांना मिळाले नवे कलेक्टर

Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

SCROLL FOR NEXT