k L Rahul And Athiya Shetty
k L Rahul And Athiya Shetty saam tv
मनोरंजन बातम्या

के एल राहुल-आथियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; पाहा लव्हबर्डचे जबरदस्त फोटो

नरेश शेंडे
भारतीय क्रिकेट संघांचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी त्यांच्या प्रेमकहाणीमुळं नेहमीच चर्चेत राहिले. गेल्या काही वर्षांपासून राहुल-आथिया एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लव्ह अफेर्सबद्दल अधिकृतपणे जाहीर केलं होत. आता हे जोडपं लवकरच लग्न बंधनात अडकणार असून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सरुवात करणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आथिया शेट्टी आणि के एल राहूल यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली असल्याची चर्चा होती. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आथिया-राहुलमध्ये प्रेमाचं नातं फुलतंय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
के एल राहुल जेव्हा टेस्ट सीरिजसाठी इंग्लडला गेला होता त्यावेळी आथिया शेट्टीपण त्याला सपोर्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली होती. सुरुवातीला दोघेही त्यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत व्यक्त होत नव्हते. मात्र, दोघेही सोशल मीडियावर सक्रिय राहून एकमेकांचे रोमॅंटीक फोटो शेअर करत होते. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं जगासमोर जाहीर झालं.
केएल राहुलचा नुकताच ३० वा वाढदिवस झाला. राहुलला त्याच्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड आथिया शेट्टीने रोमॅंटिक फोटो शेअर करत शुभेच्छाही दिल्या. ' तुझ्यासोबत कुठेही, हॅप्पी बर्थ डे' असे कॅप्शन देत आथियाने राहुलसोबतचे प्रेमसंबंध आणखी गडद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT