Jurassic Park actor Sir Sam Neill passes away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कॅन्सरवर मात केली, पण काळाने केला घात, मनोरंजन विश्वात शोककळा

Actor Jurassic Park: कॅन्सरवर यशस्वीपणे मात करून नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहते आणि सहकलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Actor Death: हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सॅम नील यांचे वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करत ही दुःखद बातमी दिली. सिडनी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार त्यांचे निधन वयवृद्धामुळे झाले असले तरी, त्याआधी कर्करोगा सारख्या आजारापासून बरे झाले होते.

सॅम नील यांना जगभरात सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती जुरासिक पार्क या चित्रपटातील डॉ. अॅलन ग्रँट या भूमिकेमुळे. डायनासोरवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले आणि त्यातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. त्यांनी या फ्रँचायझीतील पुढील चित्रपटांमध्येही ही भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन केले.

१४ सप्टेंबर १९४७ रोजी उत्तर आयर्लंडमधील ओमाघ येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणीच ते कुटुंबासह न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास १९७७ मधील स्लीपिंग डॉग्ज या चित्रपटातून सुरू झाला. त्यानंतर द पियानो, द हंट फॉर रेड ऑक्टोबर, डेड काम, इव्हेंट होरायझन, पीकी ब्लाइंडर्स आणि मर्लिन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपट व मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

सॅम नील यांच्या पश्चात चार मुले आणि नातवंडांचा परिवार आहे. २०२३ मध्ये सॅम नील यांनी रक्ताचा कर्करोग झाला असल्याची माहिती दिली होती. उपचारांनंतर ते पूर्णपणे कर्करोगातूनमुक्त झाल्याचे त्यांनी यावर्षीच सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. २०२२ मध्ये चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 'नाइटहूड' सन्मानाने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील चाहते, कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लादी पुसल्यानंतरही चिकट वाटते? पाण्यात 'हा' एक पदार्थ मिसळून पाहा

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांनी नागपुरात येथील संघस्थानी जाऊन मतमस्तक व्हावे - आमदार रवी राणा

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर; पत्नी सुनीला शर्मा यांचे निधन, संगीतविश्वात हळहळ

Hair Growth Tips: केस गळणं होईल कायमचं बंद! डोक्यावर नवीन केस आणेल 'हा' १ चमत्कारी काळा पदार्थ

EPFO New Scheme : EPFO ची मोठी घोषणा! फक्त 6 महिन्यांसाठी नवी योजना, कोणाला मिळणार फायदा?

SCROLL FOR NEXT