Crime News: जबरदस्ती रुममध्ये शिरला, नंतर प्रायव्हेट पार्ट दाखवून...; बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंटकडून तरुणीशी अश्लील वर्तन

Crime News: बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंटवर महिलेशी अश्लील वर्तनाचा आरोप झाला. दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील अशाच घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Bengaluru delivery agent
Bengaluru delivery agentSaam Tv
Published On

Crime News: ऑनलाइन शॉपिंग आणि घरपोच सेवा आता दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. देशभरात लाखो डिलिव्हरी एजंट प्रामाणिकपणे सेवा देत असले, तरी काही डिलिव्हरी एजंटमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अलीकडेच बेंगळुरूमध्ये घडलेल्या एका घटनेने याबाबत चिंता वाढवली आहे.

बेंगळुरूच्या मराठाहल्ली परिसरात एका महिलेने फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी एजंटवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार, डिलिव्हरी एजंटने वारंवार नकार देऊनही तिच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने वॉशरुम वापरण्याची विनंती केली आणि बाहेर आल्यानंतर तिच्यासमोर अश्लील कृत्य करत गुप्तांग उघडे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी विजय मल्लिकार्जुन कामत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Bengaluru delivery agent
Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

यापूर्वीही अशाच प्रकारच्या काही घटना देशातील विविध शहरांत घडल्या आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये दिल्लीतील एका महिलेने ब्लिंकिटच्या डिलिव्हरी एजंटवर अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या घटनेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कंपनीने संबंधित एजंटचा करार रद्द केला. मात्र, या प्रकरणात अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

Bengaluru delivery agent
Famous Singer Death: भारतीय संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

मुंबईतही ऑक्टोबर २०२५ मध्ये एका महिला ग्राहकाच्या विनयभंगाचा आरोप ब्लिंकिटच्या डिलिव्हरी एजंटवर झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कंपनीने संबंधित एजंटवर कारवाई केली आणि पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. बेंगळुरूमध्येच आर. टी. नगर परिसरात एका २१ वर्षीय ब्राझिलियन मॉडेलने डिलिव्हरी आलेल्या एजंटवर अयोग्य वर्तन आणि विनयभंगाचा आरोप केला होता. सुरुवातीला भीतीमुळे तिने तक्रार केली नव्हती. मात्र, नंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याशिवाय, ३ जुलै २०२५ रोजी पुण्यातील कोंढवा परिसरात कुरिअर डिलिव्हरी एजंट असल्याचे भासवून एका व्यक्तीने घरात घुसून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com