Salman Khan Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानला मारण्याचा कट: बिश्नोई गॅंगने दिली अल्पवयीन मुलाला सुपारी

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) अनेक दिवसांपासून संकटात होता. जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन आणि पत्र त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अधून-मधून येत होते. यामागे लॉरेंस बिश्नोईचा हात होता. त्याने सलमान खानाला संपविण्याच्या कट रचला होता. यात लॉरेंस अपयशी झाला असून या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

पंजाब पोलिस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशी दरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाला दोन संशयित व्यक्ती सापडल्या आहेत. त्यातील एक मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. तसेच या अल्पवयीन मुलावरच बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्शदीप सिंग असे त्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. स्फोटके बाळगण्याप्रकरणी त्याला हरियाना पोलिसांनी अटक केली होती. लॉरेंस बिश्नोई याने पंजाबचा गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या टोळीबरोबरच अर्शदीपला हाताशी घेऊन सलमान खानला मारण्याचा कट रचला होता अशी माहिती पोलिस चौकशीतून स्पष्ट झाली आहे. अर्शदीपसह दीपक आणि दागर दोन गुंडानाही त्यांनी या कटात सामील केले होते. या दोघांपैकी एक फरार असून एक तुरुंगात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT