Shark Tank India Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shark Tank India: 'भावा, मला माफ कर' अमन गुप्ताची आधी ऑफर मग चेकच फाडला, शार्क टँक इंडिया शोमध्ये नेमकं काय घडलं?

Judge Aman Gupta tear check: शो 'शार्क टँक इंडिया 3' मध्ये डील ऑफर केल्यानंतर जज अमन गुप्ताने चेक फाडला आहे. त्यांनी डीलमधून माघार घेतली. हे प्रकरण काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aman Gupta Tear Check On Shark Tank India

बोटचे सह-संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अमन गुप्ता (Aman Gupta) यांनी आनंद नहार आणि अमृत या दोन व्यावसायिक भावांना 'शार्क टँक इंडिया 3' वर डील ऑफर केल्यानंतर चेक फाडला. त्यांच्या फास्ट फूड ब्रँड झॉर्कोची पिच करताना, सोनी लिव्हवरील बिझनेस टीव्ही शोमधील या दोन व्यावसायिकांनी 1 टक्के इक्विटीसाठी 1.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. (latest entertainment news)

या मागणीसाठी, ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल आणि बोटचे सीईओ अमन गुप्ता यांनी तीन वर्षांत 1 टक्के इक्विटीसाठी 20 लाख रुपये आणि 10 टक्के व्याजावर 1.3 कोटी रुपयांचे कर्ज देऊ केलं होतं. परंतु या दोन्ही भावांनी आर्थिक अटींव्यतिरिक्त, त्यांनी शार्ककडून (Shark Tank India) व्यवसायासाठी 100 तासांचा वेळ देण्याची मागणी केली. तेव्हा ही डील संपली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रितेश अग्रवालचीही डीलमधून माघार

जज अमन गुप्ता यावेळी म्हणाले की, खोटी आश्वासनं देता येत नाहीत. व्यवसायासाठी 50 तासांचं वेळ देणं शक्य नाही, पण विश्वास ठेवावा लागेल. तर रितेश अग्रवाल 20 तास देण्यास तयार होते. त्याचवेळी आनंद नहार आणि अमृत हे दोन्ही भाऊ जजकडे 100 ऐवजी 50 तासांचा वेळ मागण्यावर ठाम होते. त्यांच्या हट्टीपणाला कंटाळून, अमन गुप्ताने चेक (Aman Gupta Tear Check) फाडला. भाऊ, मला माफ करा म्हणत त्याने डीलमधून माघार घेतली.

भावांनी निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवल्याने रितेश अग्रवालनेही डीलमधून माघार घेतली. रितेश अग्रवाल म्हणाले की, मला वेळेबाबत कोणतीही अडचण नाही, परंतु तुम्हाला अमनच्या बाजूने विश्वास ठेवावा लागेल. हा व्हिडिओ (Shark Tank India) यूट्यूबवर पोस्ट केल्यानंतर जवळपास 10 लाख वेळा पाहिला गेला आहे.

त्यांची कंपनी काय करते

गुजरातच्या सुरत येथील नाहर बंधूंनी 2016 मध्ये Zorco स्थापन केली आहे. Zorco ने कोणत्याही बाह्य निधीशिवाय केवळ 17 महिन्यांत 150 आउटलेट सुरू केले आणि चांगला नफा कमावला आहे. कंपनी पिझ्झा, सँडविच, बर्गर, टोस्ट, मोमोज, मिल्कशेकसह 80 हून अधिक खाद्य उत्पादनं विकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO

Vidula Chougule: चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण?

iPhone 15: आयफोन १५ वर मोठी सूट! अमेझॉन फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये मिळेल फक्त 'या' किमतीत

SCROLL FOR NEXT