Jr NTR Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jr NTR: अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, शुटिंगवेळी झाली होती दुखापत; पुढील ३ महिने घ्यावी लागणार सक्तीची विश्रांती

Jr NTR: ज्युनियर एनटीआरवर खांद्याची आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली. KIMS रुग्णालयात उपचारानंतर अभिनेता रिहॅबिलिटेशन सुरू करणार असून दोन-तीन महिन्यांत बरा होण्याची अपेक्षा आहे.

Shruti Vilas Kadam

Jr NTR: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरवर बुधवारी हैदराबादमधील KIMS रुग्णालयात खांद्याची आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. जुलैच्या अखेरीस खांद्याला दुखापत झाल्यानंतर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. सध्या एनटीआर डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

२७ जुलैला शूटिंग सेटवर एनटीआरच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सहा ते आठ आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेची माहिती दिली.

सिकंदराबाद येथील KIMS रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून एनटीआरची प्रकृती स्थिर आहे. आता डॉक्टरांच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन महिने पूर्णपणे बरं होण्यास जाईल.

याचा थेट परिणाम एनटीआरच्या आगामी चित्रपटांच्या शूटींगवर होण्याची शक्यता आहे. तो सध्या 'KGF' आणि 'Salaar' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाला चाहत्यांकडून 'ड्रॅगन' असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय 'देवरा: पार्ट १'च्या पुढील भागातही एनटीआर दिसणार आहेत. मात्र, 'देवरा: पार्ट २'च्या शूटिंगबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT