Jolly LLB 3 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3' चा ओपनिंग डेला बोलबाला, पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Jolly LLB 3 Opening Day Collection : अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने पहिल्याच दिवशी थिएटर गाजवले आहे. किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जॉली एलएलबी 3' हा कोर्ट ड्रामा आहे.

'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे.

'जॉली एलएलबी 3'मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) रिलीज झाला आहे. चित्रपट 19 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बंपर ओपनिंग केली आहे. कोर्ट ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. 'जॉली एलएलबी 3' हा जॉली एलएलबी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई ( Box Office Collection ) केली, जाणून घेऊयात.

'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3' ने पहिल्या दिवशी 12.50 कोटी रुपये कमावले आहे. सकाळच्या शोमध्ये चित्रपटाने सुरुवात फक्त 10.28 टक्के, दुपारी 17.46 टक्के कमाई केली. मात्र 'जॉली एलएलबी 3'ची कमाई 'जॉली एलएलबी 2'च्या तुलनेत कमी राहिली आहे. 'जॉली एलएलबी 2'ने पहिल्या दिवशी 13 कोटींची कमाई केली होती.

'जॉली एलएलबी 3' ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

मीडिया रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 6 कोटींचा टप्पा ओलांडला. 'जॉली एलएलबी 3' चे बजेट जवळपास 120 कोटी रुपये आहे. 'जॉली एलएलबी 3'ने आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' ला मागे टाकले आहे. 'सितारे जमीन पर'ने पहिल्या दिवशी 10.20 कोटींची कमाई केली होती.

'जॉली एलएलबी ' 2013 मध्ये आणि 'जॉली एलएलबी 2 ' चित्रपट 2017 ला रिलीज झाला. 'जॉली एलएलबी 3'मध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आणि अर्शद वारसी पाहायला मिळत आहे. त्यासोबत चित्रपटात सौरभ शुक्ला,अमृता राव आणि हुमा कुरेशी हे कलाकार देखील झळकले आहेत. 'जॉली एलएलबी 3' हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - ईश्वरपूरमध्ये पोलीस आणि जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरमधून मोठी गळती, आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Deepika Padukone: प्रभाससोबतचा चित्रपट सोडल्यानंतर दीपिकाची मोठी घोषणा; किंग खानसोबताच फोटो शेअर करत म्हणाली...

GST News : GST कपात लाभ एप्रिलपासून! सोमवारपासून नाहीच | VIDEO

Marathwada Heavy Rain : अतिवृष्टीचा फटका; मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान, १९ लाख शेतकरी बाधित

SCROLL FOR NEXT