Sangeet Devbhabhli Natak Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangeet Devbhabhli Natak: 'अबोला धरलेली सखी सापडलीच...' कवितेच्या माध्यमातून जितेंद्र जोशीचा 'संगीत देवबाभळी' नाटकाला निरोप

Sangeet Devbhabahli Marathi Natak: संगीत देवबाभळी नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला. कार्तिकी एकादशीच्या मुहुर्तावर या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jitendra Joshi Post Poem For Sangeet Devbhabhli Natak:

मराठी इंडस्ट्रीत चित्रपटांसोबतच नाटकाला खूप जास्त महत्त्व आहे. अनेक कलाकारांची सुरुवात ही रंगभूमीपासून झाली आहे. मराठी प्रेक्षक नाटकांवर मनापासून प्रेम करतात. असेच एक नाटक म्हणजे संगीत देवबाभळी. या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेली सहा वर्ष या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.

नुकताच संगीत देवबाभळी नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला. कार्तिकी एकादशीच्या मुहुर्तावर नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात शेवटचा प्रयोग सादर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या नाटकाने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला.

संगीत देवबाभळी नाटकाचे प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनीही नाटकाचे खूप कौतुक केले आहे. नुकतच जितेंद्र जोशीने सोशल मीडियाच्या माध्यामातून संगीत देवबाभळी नाटकासाठी कविता लिहली आहे.

स्वागताला रांगोळी रेखाटली

आवली च्या चुलीतल्या राखेची

आणि निरोपाला

तिच्या पायाच्या जखमेची चिंधी

हातात देत

तुकोबाच्या गाथेतलं एक एक पान घेऊन

अभंगाच्या ओव्या त्यानं वाटल्या

त्याला समजलेला अर्थ मौनात ठेवून

ज्याला त्याला त्याचा त्याचा अर्थ

अलगद मनात झिरपवू दिला

आणि

आजवर भेटायला आलेल्या प्रत्येकाला म्हणाला

तुमचा तुमचा

तुका आणि विठू

तुमचा तुम्ही शोधा

तो सापडो अथवा न सापडो

परंतु रुसलेली , जखम झालेली,

अबोला धरलेली सखी सापडलीच

तर मात्र मदत करा

तिला तिचा पाऊस शोधायला

तिचा पाय बुडेल तीच तुमची इंद्रायणी

तिच्या सोबत तंद्रटपणे भिजा

तिला ते स्वप्न वाटेल मग

तुम्ही सुद्धा डोळे बंद करून तिचं

स्वप्न होण्यासाठी तिचे डोळे व्हा

तिच्या सोबत तुम्हीही हाका

मारून बोलवा तिच्या सख्या ला

कुणी येवो ना येवो

हाक मात्र आत्म्याची असू दे

या जन्मात नाही तर पुढच्या

तो येवो ना येवो

सर्वांना हाक मारण्याची असोशी

आणि आत्मा मिळो

तुका , विठो मिळो ना मिळो

आवली कळो.. रखुमाई कळो

आ..... वं.....

– जितेंद्र शकुंतला जोशी

#देवबाभळी #निरोप

या कवितेतून जितेंद्र जोशीने नाटकाला निरोप दिला आहे.

'संगीत देवबाभळी' नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले आहे. अवघ्या महाराष्ट्राला विठुमय करणाऱ्या या नाटकाने ५०० प्रयोग पूर्ण केले आहेत. त्यानंतर आता तुर्तास या नाटकाचा प्रवास थांबला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT