मनोरंजन बातम्या

Jigra Box Office Collection: 'जिगरा' पाहण्यासाठी प्रेक्षकांची हिंमत होईना; बॉक्स ऑफिसवर आपटला आलियाचा चित्रपट

Jigra Box Office Collection Day 1: आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या 'जिगरा' या चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरलाय. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. जे निर्मात्यांना खूप निराश करणारे आहेत.

Bharat Jadhav

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा जिगरा हा नवीन चित्रपट शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना जी अपेक्षा होती ती पूर्ण करण्यात जिगरा चित्रपट अपयशी ठरला. जिगरा चित्रपटाच्या कमाईत पहिल्याच दिवशी मोठी घसरण झाली. ट्रेलरपासून ते ॲडव्हान्स बुकिंगपर्यंत चित्रपटाने धमाल उडवून दिली होती. मात्र तरीही हा चित्रपट ओपनिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. चित्रपटाची कथा बहीण आणि भावावर दाखवण्यात आली आहे.

जिगरा या चित्रपटामध्ये वेदांग रैना आलिया भट्टच्या भावाची भूमिका साकारत आहे. बहीण भावाला प्रेक्षकांचे जेवढे प्रेम अपेक्षित होते तेवढे मिळाले नाहीये. Sacnilk च्या माहितीनुसार, जिगरा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी खूपच निराशाजनक कलेक्शन केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, जिगरा चित्रपटाला वीकेंडलाही मोठी कमाई करता आली नाही.

हा चित्रपट चांगला कलेक्शन करू शकेल अशी आशा निर्मात्यांना आहे. पण सुरुवातीच्या कमाईवर नजर टाकली तर जिगराने त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी केवळ 4.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय. दरम्यान हा चित्रपट भविष्यात चांगली कामगिरी करू शकेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून वाद

'जिगरा' चित्रपट रिलीज होताच कंगना राणौतने आलियाला सुनावलंय. आता दिव्या खोसला हिनेही 'जिगरा' चित्रपटावर टीका केलीय. 'जिगरा'च्या बनावट बॉक्स ऑफिस कलेक्शनचा मुद्दा उपस्थित करत तिने टीका केलीय. याबाबत एक दीर्घ पोस्टही लिहिलीय. दिव्या खोसलाने एक फोटो शेअर करत 'जिगरा' संदर्भात लांबलचक पोस्ट लिहिलीय.

या फोटोमध्ये एक रिकामे थिएटर आहे. अभिनेत्री दिव्या आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'मी 'जिगरा'चा शो पाहण्यासाठी सिटी मॉल पीव्हीआरमध्ये गेले होते. थिएटर पूर्णपणे रिकामे होते. इतर चित्रपटगृहेही रिकामी आहेत. मला आलिया भट्ट खूप आवडते. ती स्वतः तिकिटे खरेदी करत आहे आणि बनावट कलेक्शन जाहीर करतेय, असा आरोप अभिनेत्री दिव्या यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT