Jhimma 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2: 'आपली भाषा त्याला...' हेमंत ढोमेने करुन दिली 'झिम्मा २' मधील परदेशी कलाकराची ओळख

Jhimma 2 Movie: 'झिम्मा २' चित्रपटात अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. चित्रपटात एका परदेशी कलाकाराची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jhimma 2 Movie New Character:

झिम्मा २ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटात आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना चित्रपटाबाबत खूप जास्त उत्सुकता आहे. प्रेक्षक चित्रपटाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.

झिम्मा २ चित्रपटातील कलाकारांचीदेखील खूप जास्त चर्चा आहे. चित्रपट सात बायकांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात सात बायका काय मज्जा करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. चित्रपटात अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. 'झिम्मा २' मध्ये एका परदेशी कलाकाराची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या नवीन कलाकाराबद्दल सर्वांना उत्सुकता होती. हा कलाकार कोण? तो कोणते पात्र साकारणार आहे? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

हा परदेशी कलाकार म्हणजे जॅक मॅकगिन. जॅक मॅकगिनने यापूर्वी हेमंत ढोमेच्या सनी चित्रपटातदेखील काम केले होतं. तो एक उत्तम अभिनेता आणि संगीतकार आहे. या नवीन कलाकारासाठी हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमंतने क्षिती आणि जॅक मॅकगिनसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर 'झिम्मा २ या आपल्या चित्रपटात अत्यंत महत्तवाची भुमिका साकारणारा आमचा मित्र @jackcmcginn खास सातासमुद्रापार इकडे आलाय, आपल्या सिनेमासाठी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी… चित्रपटात त्याने साकारलेली भुमिका तुम्हाला नक्की आवडेल! त्याला आपली भाषा बऱ्यापैकी शिकवलीय… तो अतिशय प्रेमाने म्हणतो.. “म्हला मॅजा ॲली” पण मित्रा तू आल्यामुळे खरच खूप मजा आली! थँक्यू जॅक, अगदी शेवटची वेळी होकर देण्यासाठी. मला खात्री आहे की, तुला महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळेल'. असं कॅप्शन दिले आहे.

'झिम्मा २' चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची चित्रपटगृहाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ चित्रपटात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर अशी तगडी कास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trending Blouse Designs For Women: दसऱ्यानिमित्त महिलांनी करा खास पारंपारिक पोशाख, हे आहेत ट्रेंडी ब्लाऊजचे पॅटर्न्स

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

Thursday Horoscope: वाईट काळ संपला ! दसऱ्यापासून ‘या’ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई

Good News: लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणा; यंदाच्या दिवाळीपासून 'या' महिलांनाही मिळणार १५०० रूपये

SCROLL FOR NEXT