Yogita Chavan And Saorabh Choughule Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नानंतर Yogita Chavan आणि Saorabh Choughule ने घेतलं सिद्धिविनायकाचे दर्शन, बाप्पा चरणी झाले नतमस्तक

Yogita Chavan And Saorabh Choughule Visit Siddhivinayak Temple: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हे कपल सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Yogita Chavan And Saorabh Choughule:

'जीव माझा गुंतला' (Jeev Majha Guntala) फेम अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh Choughule) रविवारी विवाहबंधनात अडकले. याच मालिकेत एकत्र काम करता करता योगिता आणि सौरभ प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनीही रिल लाइफ पार्टनरची रिअल लाइफमध्ये देखील पार्टनर म्हणून निवड केली. मोठ्या धुमधडाक्यामध्ये या कपलचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हे कपल सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्नानंतर मुंबईतल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी माथा टेकून या कपलने प्रार्थना केली आणि नव्या आयुष्याची सुरूवात करताना बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यावेळी योगिताने पिंक कलरचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, लाईट मेकअप आणि मोकळे केस ठेवत योगिताने लूक केला होता. तर सौरभने लाइट पोपटी कलरचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. योगिता आणि सौरभ दोघेही खूपच क्युट दिसत होते.

योगिता आणि सौरभला पाहून चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्याचसोबत यावेळी चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, योगिता आणि सौरभचा लग्नातील एक क्युट व्हिडीओ व्हायरल होत होता. यामध्ये दोघांनी देखील एकमेकांसाठी सुंदर उखाणा घेतला होता. त्यांचा उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

योगिता लग्नानंतर उखाणा घेताना म्हणते की, 'जागोजागी होईल मला याचाच भास, सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास' तर सौरभ देखील आपल्या बायकोसाठी खास उखाणा घेतो. उखाणा घेताना सौरभ म्हणतो की, 'एक होती चिऊ, एक होता काऊ…योगिताला घास भरवायला मी वाट कोणाची पाहू' त्यांच्या या व्हिडीओला खूप चांगली पसंती मिळत आहे. चाहत्यांनी दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, योगिता आणि सौरभने जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये एकत्र काम केले. या मालिकेमध्ये योगिताने अंतराची भूमिका साकारली होती. तर सौरभने मल्हारची भूमिका साकारली होती. या जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. या मालिकेमुळे या कपलला विशेष पसंती मिळाली. आता या रिललाइफ कपलने रिअल लाइफमध्ये एकमेकांसोबत लग्न केल्यामुळे त्यांचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT