Jaya Bachchan On PM Narendra Modi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा जया बच्चन यांना हेवा; म्हणाल्या, 'आपल्याकडे मोदीजी सर्वाधिक लोकप्रिय...'

Jaya Bachchan On PM Narendra Modi: बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी अलीकडेच एका वाहिनीला सांगितले की, राजकारणी अभिनेत्यांइतके लोकप्रिय नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन एक लोकप्रिय राजकारणी म्हणून केले.

Shruti Vilas Kadam

Jaya Bachchan: बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन चित्रपटांसोबतच राजकारणातही सक्रिय आहेत. संसद भवनात त्यांनी देशातील अनेक प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपले विचार उघडपणे व्यक्त केले आहेत. आता, या बच्चन यांनी राजकीय पक्षांना चित्रपट स्टारकडून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल मत मांडले आहे. अभिनेत्रीने कबूल केले की एक छोटासा अभिनेता देखील राजकारण्यापेक्षा जास्त लोकप्रिय असतो आणि जनता त्या अभिनेत्याला फॉलो करते.

जया बच्चन यांनी इंडिया टीव्हीला सांगितले की, "अभिनेते देखील महत्त्वाकांक्षी असतात. अनेक कामासाठी चित्रपट अभिनेत्याला बोलावतात कारण चार लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जर एखादा चित्रपट अभिनेत्याची सुरुवात असेल तरी, लोक त्याला भेटायला गर्दी करतात. परंतु राजकारणात लोकांना गर्दीने येऊन आपल्या नेत्याचे ऐकावे असे वाटते, तर प्रथम नेत्यांना जाऊन सामान्य लोकांना भेटावे लागेल आणि त्यानंतरच लोक तुमच्यासाठी येतात."

पुढे, जेव्हा अँकरने अभिनेत्रीला विचारले की राजकारणी लोकप्रिय नाहीत का? यावर उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या, "हो, आपल्याकडे श्री नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पण अन्य राजकारण्यांपेक्षा अभिनेते जास्त लोकप्रिय आहेत."

जया बच्चन २००४ पासून राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय, अभिनेत्री चित्रपटातही काम करत आहेत. त्या शेवटच्या करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात दिसल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT