Shah Rukh Khan Jawan Trailer Released Instagram
मनोरंजन बातम्या

Jawan Trailer: ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स अन् बहुरुपी शाहरुख... बहुप्रतीक्षित 'जवान'चा दमदार ट्रेलर रिलीज

Jawan Trailer Out: शाहरूख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Jawan Trailer Released

शाहरूख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेला हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असताना, या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

शाहरूखच्या विविध लूक्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून अभिनेत्याच्या धमाकेदार ॲक्शनने आणि अफलातून स्टंट्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेय. ट्रेलर प्रदर्शित होऊन अवघ्या काही वेळातच ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळालेले दिसून येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. शाहरूखचा चाहतावर्ग किती मोठा आहे, याचे उत्तर आज आपल्याला समजेल. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचे देशातच नाही तर, परदेशातही प्री तिकीट अनेक बुकींग रेकॉर्ड तोडले आहेत.

पोलिसांच्या भूमिकेत दिसणारी नयनतारा आणि विजय सेतुपतीचा धमाकेदार व्हिलन लूक करताना दिसत आहे. आपल्या मिशनवर असलेल्या शाहरुखला रोखण्यासाठी नयनतारा अनेक गोष्टींच्या माध्यमातून ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. शाहरूखसह अनेक कलाकारांचा ॲक्शन मोड थिएटरमध्ये प्रचंड गाजेल याच्यात काहीही शंका नाही. शाहरुखच्या मिशनचा पॉइंट असलेला खलनायक विजय सेतुपतीची भूमिकाही खूपच चर्चेत आहे. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये सेतुपती आणि शाहरुख यांच्यातील ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी झळकणार आहेत. चित्रपटातील गाण्यांना धमाकेदार प्रतिसाद मिळाल्यानंतर, सध्या ट्रेलरची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे. (Bollywood)

सेन्सॉर बोर्डाकडून ‘जवान’ला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ७ महत्त्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली आहे. ‘जवान’ची एकूण वेळ साधारण १६९.१८ मिनिटे आहे. U/A प्रमाणपत्राचा अर्थ असा की, सर्व वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. पण हा चित्रपट १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी हा चित्रपट पालकांसोबतच पाहणे आवश्यक आहे. सोबतच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास ७ सीन्सवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

Kolhapur : बेल्ट, बॅट, दांडक्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण हॉस्टेलमध्ये भयंकर प्रकार, मारहाणीचे Video समोर

Diwali Fort Making : दिवाळीत बच्चे कंपनीसोबत बनवा भव्य किल्ला, 'अशी' करा सजावट

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा

Diwali Car Offers: दिवाळी धमाका! मारुती कंपनीच्या 'या' कारवर तब्बल 2 लाखांपर्यंतची सूट

SCROLL FOR NEXT