Ruychell End Her Life Age Of 27 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ruychell Dies: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचा २७ व्या वर्षी मृत्यू, ऑफिसमध्येच संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Ruychell End Her Life: जपानी गायिका आणि मॉडेल युशेल टोकियो हिचं निधन झालं आहे.

Chetan Bodke

Ruychell Dies At 27: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. जपानी गायिका आणि मॉडेल युशेल टोकियो हिचं निधन झालं आहे. वयाच्या २७ व्या वर्षी युशेलचं निधन झालं आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या टोकियोतील ऑफिसमध्ये संशयास्पदरित्या आढळून आला आहे. मॉडेलच्या निधनाचे कारण अस्पष्ट असून सध्या पोलिस अधिक तपास करत आहे. (Latest Marathi News)

पोलिसांकडून युशेलने आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. युशेलचा जन्म १९९५ मध्ये जपानमधील एका प्रांतात झाला होता. जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जपानमधील LGBTQ समाजाच्या समस्या ती नेहमीच सोडवण्याचा प्रयत्न करायची. (Hollywood)

नेहमीच ती अनेक सामाजिक विषयांवर आपले परखड मत मांडण्याचा ती प्रयत्न करायची. टोकियो रेनबो प्राइडमध्ये देखील तिने सक्रियपणे सहभाग घेतला होता. मॉडेलच्या लोकप्रियता जसजशी वाढ होत गेली, तसतशी ती जपानमधील अनेक टीव्ही शो आणि विविध विचित्र कार्यक्रमांमधून प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध होत गेली. (Entertainment News)

२०१६ मध्ये युशेलने बॉयफ्रेंड पेकोसोबत लग्न केले होते. तो देखील पेशाने मॉडेल आहे. युशेल एका मुलाची आई देखील आहे, दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही २०२२ मध्ये त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांपासून घटस्फोट घेत असल्याचा निर्णय चाहत्यांसोबत देखील शेअर केला होता. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT