janhvi kapoor saam tv
मनोरंजन बातम्या

जागतिक मातृदिन : जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या आठवणींना दिला उजाळा, रोज तुमचं प्रेम...

अनेक भाषेतील चित्रपटांत श्रीदेवीनं अष्टपैलू अभिनय करून उमद्या कलाकाराचा ठसा उमटवला.

नरेश शेंडे

सिनेमांमध्ये अष्टपैलू अभिनय सादर करुन केवळ बॉलिवूडच (Bollywood) नाही तर तमिळ, तेलुगु , मल्याळम, कन्नड अशा अनेक भाषेतील चित्रपटांत श्रीदेवीनं (Sridevi) उमद्या कलाकाराचा ठसा उमटवला. श्रीदेवीनं जगाचा निरोप जरी घेतला असला, तरी त्यांच्या आठवणी आजही कपूर कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या मनात जीवंत आहेत. आज जागतिक मातृदिनानिमित्त (Mothers day) बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं (Janhvi Kapoor) दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जान्हवीनं तिच्या आईसोबत (श्रीदेवी) असलेला एक स्पेशल थ्रो बॅक फोटो इंन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. जान्हवीनं फोटोसोबत भावुक मेसेजही लिहिला आहे.

जान्हवीला आली आईची आठवण

श्रीदेवीचं तिच्या दोन्ही मुलींवर खूपचं प्रेम होतं.पण, जान्हवी कपूर आणि श्रीदेवीमध्ये खूपच जवळीक होती. श्रीदेवीची लाडकी जान्हवी तिच्या आईची नेहमीच आठवण काढते.जागतिक मातृदिनानिमित्त जान्हवीने श्रीदेवीसोबत असलेला जुना फोटो शेयर करुन मातृत्वाच्या जिव्हाळ्याला पुन्हा एकदा जीवंत केलं आहे. या फोटोसोबतच जान्हवीनं एक भावुक मेसेज लिहिला आहे. तुमच्या गैरहजेरीतही प्रत्येक दिवशी मला तुमच्या प्रेमाची आठवण होते. तुम्ही हयात नसतानाही जगातील सर्वात सुंदर माता आहेत.लव्ह यू. असं म्हणत जान्हवीने तिची आई श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिलाय.

आई श्रीदेवीसाठी जान्हवीने लिहिलेली पोस्ट सर्वांनाच भावुक करणारी आहे.सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वच जान्हवीला भरभरुन प्रेम देत आहेत. व्हाईट फ्रॉक घातलेली जान्हवी श्रीदेवीसोबत एखाद्या डॉलसारखीच दिसत आहे.सोशल मीडियावर जान्हवीने फोटो शेयर केल्यानंतर दोघांमध्ये असलेलं माय-लेकीचं नातं पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : प्रेम प्रकरणातून साताऱ्यात कांड, विवाहितेची राहत्या घरी निघृण हत्या, १२ तासात आरोपीला पुण्यात बेड्या

Ramayana : 'रामायण'मध्ये तगडी स्टार कास्ट; रणबीर, साई पल्लवी ते यश, कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

Crime: मायलेकीला खोलीत डांबून ठेवलं, भोंदूबाबाकडून अंगावर चटके देत अमानुष मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ

Interesting Fact: ऐकूनही विश्वास बसणार नाही! असा साप जो स्वतःवरच करतो हल्ला

Viral Video: बूट चोरण्यासाठी भर मंडपात नवरदेवाला आडवं पाडलं|VIDEO

SCROLL FOR NEXT