Janhvi Kapoor Home Video Instagram
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Home Video: जान्हवी कपूरच्या नव्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आई श्रीदेवीची आठवण, पाहा घराची खास झलक

Janhvi Kapoor News: सोशल मीडियावर जान्हवीने तिच्या नव्या घराचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Chetan Bodke

Janhvi Kapoor Home Video

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नेहमीच आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ‘धडक’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं आहे. आजवरच्या सिनेकारकिर्दीत जान्हवीने अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मात्र, प्रत्येक चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नुकतंच सोशल मीडियावर जान्हवीने तिच्या नव्या घराचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, घराची झलक शेअर केली आहे. (Social Media)

नुकतेच, जान्हवी कपूरने मुंबईतल्या वांद्रामधील पाली हिल भागामध्ये अलिशान डुप्लिप्लेक्स घर खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवीने हे अलिशान घर ऑक्टोबर महिन्यामध्ये खरेदी केले आहे. जान्हवी कपूरचे नवे घर ८,६६९ स्क्वेअर फूट इतके आहे. तिच्या ह्या घराची किंमत ६५ कोटी रुपये इतकी आहे. जान्हवीने ह्या घरासाठी ३.९० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरला आहे. तिच्या ह्या नव्या घरामध्ये खूप चांगल्या सुख सोयी सुविधाही आहेत. (Bollywood Actress)

जान्हवीने कपूरने सोशल मीडियावर तिच्या घराचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तिच्या नव्या घरात आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवणही तिने जपलेली दिसत आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून जान्हवीने चाहत्यांसोबत नव्या घराबद्दल खास गोष्टी सांगितल्या आहेत. जान्हवीने आपल्या घराच्या भोवती काही फुलांची झाडे सुद्धा लावलेले दिसत आहे. श्रीदेवीला मोगरा खूप आवडायचा म्हणून तिने घराशेजारी मोगऱ्याचे झाड लावले. त्यासोबत घराच्या शेजारी मोगऱ्याचा सुगंध दरवळावा म्हणूनही तिने झाडे लावले आहे. (Bollywood News)

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, जान्हवी कपूर बऱ्याच चित्रपटांतून चाहत्यांसमोर येणार आहे. नुकतीच जान्हवी ‘मिली’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. चित्रपटाची कथा खूपच रंजक असल्यामुळे तिच्या चित्रपटाची खूपच चर्चा होत आहे. याशिवाय जान्हवी कपूर 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बवाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT