Jacqueline Fernandez Mother Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिसला मातृ शोक; लीलावती रुग्णालयात आईने घेतला अखेरचा श्वास

Jacqueline Fernandez Mother Passes Away: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्या काही काळापासून आजारी होत्या आणि काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.​

किम फर्नांडिस यांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, परंतु वैद्यकीय मदतीनंतरही त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या निधनाने फर्नांडिस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी जॅकलीन फर्नांडिसचे कुटुंबीय तिच्या सोबत आहेत.​ जॅकलीन फर्नांडिस आपल्या आईसोबत खूप जवळच्या होती आणि अनेक वेळा तिने आपल्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.

किम फर्नांडिस यांच्या निधनाने बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर,​ फर्नांडिस कुटुंबीयांनी या दुःखद प्रसंगी त्यांच्या खाजगीपणाचा आदर राखण्याची विनंती केली आहे.

२४ मार्च रोजी लीलावती रुग्णालयात दाखल

२४ मार्च रोजी जॅकलिनची आई किम यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेव्हा जॅकलिनला तिच्या आईच्या तब्येतीची माहिती मिळाली तेव्हा तीही तिचे काम सोडून मुंबईला आली होती, गेल्या काही दिवसांपासून तिला सतत लीलावती रुग्णालयात होती, जॅकलिनसोबत तिचे वडीलही लीलावती रुग्णालयात होते. तिच्या आईला भेटण्यासाठी अभिनेता सलमान खान देखील रुग्णालयात गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT