टायगरच्या लव्ह लाईफबद्दल जॅकी श्रॉफ यांचं मोठं विधान Twitter/ @bindasbhidu
मनोरंजन बातम्या

टायगरच्या लव्ह लाईफबद्दल जॅकी श्रॉफ यांचं मोठं विधान

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफप्रमाणेच त्यांचा मुलगा टायगर श्रॉफनेही फार कमी वेळात नाव कमावले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफप्रमाणेच (Jackie Shroff) त्यांचा मुलगा टायगर श्रॉफनेही (Tiger Shroff) फार कमी वेळात नाव कमावले आहे. आपल्या अभिनय आणि एक्शनमधून त्याने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. चाहत्यांना त्याची वेगळी स्टाईल आणि डान्स खूप आवडतो. टायगर त्याच्या चित्रपटांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. टायगर श्रॉफ अनेकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत (Disha Patni) दिसला आहे. त्याच्या लव्ह लाईफबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा चालू असतात. तथापि, त्यांनी अद्याप त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही. यावर टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनी मोठा खुलासा केला आहे.

टायगर श्रॉफचे वडील अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाच्या लव्ह लाइफबद्दल उघडपणे बोलले आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, 'माझ्या मुलाने फक्त वयाच्या 25 व्या वर्षी डेटिंग सुरू केली आहे. ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल काय विचार याची मला कल्पना नाही. परंतु, हो मला हे माहित आहे की टायगर आपल्या कामाबद्दल खूपच गंभीर आहे.

जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, 'माझ्यासाठीदेखील टायगरचं काम प्रथम आहे, त्यापेक्षा वेगळं काही नाही. टायगर आपल्या कामाकडे खूप लक्ष देतो जी एक चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ म्हणतो, 'मी माझ्या भावावर माझ्याइतकेच लक्ष देतो, आता तो मोठा झाला आहे आणि जबाबदार झाला आहे. तो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. काय योग्य आहे आणि काय चूक आहे हे त्याला माहित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

SCROLL FOR NEXT