Anil Kapoor Birthday Instagram @anilskapoor
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Birthday: जॅकी श्रॉफने १७ वेळा अनिल कपूरच्या कानाखाली मारल्या होत्या, असं नेमकं काय घडलं होतं?

१९८९ साली जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरचा 'परिंदा' चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Pooja Dange

Anil Kapoor Birthday Special: अनिल कपूर बॉलिवूडमधील त्यांच्या भूमिकांसाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या तारुण्यासाठी ओळखले जातात. अनिल कपूर आज ६६ वर्षाचे झाले आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे. पण जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांची जोडी अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. दोघांचेही अनेक किस्से आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्यातील एक आठवण.

अनिल कपूर यांनी बॉलिवूडआधी तेलगू चित्रपट सृष्टीत मुख्य कलाकार म्हणून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी १९८३ साली 'वो सात दिन' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. स्पॉट बॉय म्हणून काम करणारा अभिनेता झाला. पहिल्या चित्रपटानंतर देखील अनिल कपूर यांना प्रचंड काम मिळविण्यासाठी मेहनत करावी लागली. (Bollywood)

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ ही जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. १९८९ साली या दोघांचा 'परिंदा' चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिल आणि जॅकी यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरला. या चित्रपटात जॅकी मोठा भावाच्या तर अनिल कपूर लहान भावाच्या भूमिकेत होते. (Movie)

एका सीनमध्ये जॅकी यांना लहान भाऊ अनिल कपूरला जोरात कानाखाली मारायचे होते. पहिल्याच शॉटमधला हा सीन सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी ओके सुद्धा म्हटले. पण अनिल त्यांच्या एक्सप्रेशनवर खूश नव्हते. यानंतर हा सीन पुन्हा शूट करण्यात आला, पण यावेळीही अनिल त्यांच्या एक्सप्रेशनवर समाधानी नव्हते. या सीनचा पुन्हा रिटेक झाला आणि हे करत असताना जॅकी श्रॉफने अनिल कपूरला १७ वेळा कानाखाली मारली होती.

Jackie Shroff and Anil Kapoor

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी राम-लखन, त्रिमूर्ती, युद्ध, रूप की रानी चोरों का राजा आणि कभी ना कभी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये जॅकीने मुख्यतः अनिल कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT