Jabrat Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jabrat Movie: मैत्री जागणाऱ्या अतरंगी मित्रांची कथा; 'जब्राट' हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Jabrat Marathi Movie: आपल्या मैत्रीला जागणाऱ्या मित्रांची कथा सांगणारा तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित 'जब्राट' हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी रुपेरी पडद्यावर येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Jabrat Marathi Movie: आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी भेटतात. यात काही जण कायम आपल्यासोबत राहतात. मैत्री अखेरपर्यंत निभावणं प्रत्येकाला जमत नाही. आपल्या मैत्रीला जागणाऱ्या मित्रांची कथा सांगणारा तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित 'जब्राट' हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी रुपेरी पडद्यावर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दमदार असं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ या फॉर्म्युल्यावर आधारित असलेला 'जब्राट' हा चित्रपट नववर्षारंभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नव्या पिढीतील आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर यांच्यासोबत ज्येष्ठ कलाकार संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांचाही सहभाग आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अनिल अरोरा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण अनिकेत खंडागळे यांचं असून, नृत्यदिग्दर्शन ‘लावणी किंग’ म्हणून ओळखले जाणारे आशिष पाटील यांनी केले आहे.

संगीत हा या चित्रपटाचा सर्वात मोठा आकर्षण ठरणार असून, डॉ. जयभीम शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमाप आणि इतर नामवंत गायकांनी गाणी सादर केली आहेत. प्रेमगीते, प्रेरणादायी गाणी आणि लोकगीतांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना संगीताच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ‘जब्राट’ हा चित्रपट मैत्री, प्रेम आणि मनोरंजनाचा खऱ्या अर्थाने जबरदस्त मेजवानी ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT