Jaat Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jaat Box Office Collection : सनी देओलचा 'जाट' सलमानच्या 'सिकंदर'वर भारी पडणार; तिसऱ्या दिवशी किती कमावले?

Jaat Box Office Collection Day 3: सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनी देओलचा 'जाट' सलमानच्या 'सिकंदर'वर भारी पडणार आहे.

Shreya Maskar

सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' (Jaat) चित्रपटाने शनिवारी बंपर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'जाट'मध्ये बॉलिवूडचे दोन सुपरस्टार आमनेसामने पाहायला मिळणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सनी देओल झळकला आहे. तर खलनायकाच्या भूमिकेत रणदीप हुड्डा दिसत आहे. 'जाट' चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालीनेनी यांनी केले आहे. चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसांत (Box Office Collection Day 3) किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'जाट' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

'जाट' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. 'जाट' 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चिपटातील सनी देओल आणि रणदीप हुड्डाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'जाट' चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.62 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 7 कोटी रुपये कमावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'जाट' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी तब्बल 10 कोटींची कमाई केली आहे.

'जाट'ने कलेक्शनमध्ये रिलीजच्या तिसऱ्या दिवशी भरारी घेतली आहे. वीकेंडला चित्रपटाने तगडे कलेक्शन केले आहे. तीन दिवसात 'जाट' चित्रपटाने 26.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. भविष्यात हा चित्रपट सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक करेल असे बोले जात आहे.

'सिकंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सलमान खानचा (Salman Khan ) 'सिकंदर' (Sikandar) 30 मार्चला रिलीज झाला. सलमान खान आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 128.35 कोटीं रुपयांची कमाई केली आहे. भविष्यात 'सिकंदर'ला 'जाट' तगडी टक्कर देणार असल्याचे चित्र दिसत आहे.

'जाट' चित्रपटात रणदीप हुड्डा 'रणतुंगा' या भूमिकेत दिसत आहे. तसेच विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कॅसेंड्रा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'जाट' चित्रपटात मराठी प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये देखील आहे. चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT