Mia Khalifa Support Palestine Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mia Khalifa Lost Job: पॅलेस्टिनींना पाठिंबा देणं मिया खलीफाला पडलं महागात, एका ट्विटमुळे गमावली नोकरी

Mia Khalifa Support Palestine: अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पॅलेस्टिनीचे समर्थन करणारे ट्वीट केले.

Priya More

Israel-Palestine Conflict:

इस्रायल-पॅलेस्टिनी (Israel-Palestine Crisis) यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या सुमारे १६०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) या युद्धाचे भयानक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

जगभरातील लोकं सोशल मीडियावर या युद्धाबाबत स्पष्टपणे आपली मतं मांडत आहेत. अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पॅलेस्टिनीचे समर्थन करणारे ट्वीट केले. हे ट्वीट मिया खलिफाला (Mia Khalifa) चांगलेच महागात पडले आहे.

मियाने एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.' या ट्विटवरून मिया खलिफाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिच्यावर टीका केली जात आहे.

मियाने केलेल्या ट्विटने रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची कंपनी यूएस आणि युरोपमध्ये प्रसिद्ध होम ग्रोथ किट्सचे उत्पादन आणि विक्री करते. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने मिया खलिफाला कंपनीत घेतले होते. मिया या कंपनीचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार होती.

रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांना इस्रायलविरुद्ध हमासवरील पोस्टबद्दल धमकी देण्यात आली आहे. यानंतर त्याने सोशल मीडियावरच मिया खलिफाला कामावरून काढून टाकल्याची घोषणा केली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. पण या ट्विटमुळे मियाने तिची नोकरी गमावली आहे.

अ‍ॅडल्ट चित्रपटांसाठी ओळखली जाणारी मिया खलिफा इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धाबद्दल स्पष्टपणे बोलली. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ तिने नुकताच केलेल्या वक्तव्याने लेबनानी-अमेरिकन माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि नव्या चर्चेला उधाण आले. मियाच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT