Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

Bigg Boss 20: बादशाहसोबतच्या नात्याला पूर्णविराम दिल्यानंतर पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी ‘बिग बॉस २०’मध्ये सहभागी होत आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती या शोमध्ये सहभागी होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: सलमान खानच्या ‘बिग बॉस २०’चा खेळ सुरु झाला आहे. पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी आता ‘बिग बॉस २०’च्या घरात प्रवेश केला आहे. यावेळी शोमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी पासूनच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे. ईशा आणि रॅपर बादशाह यांनी ३१ ऑगस्ट रोजी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तिच्या ‘बिग बॉस’मधील प्रवेशाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

ईशा ‘बिग बॉस’मध्ये का सहभागी झाली?

‘इंडिया टुडे/आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत ईशाने शोमध्ये सहभागी होण्यामागचा तिचा उद्देश स्पष्ट केला. तिला केवळ कोणाची पत्नी किंवा जोडीदार म्हणून नव्हे, तर ‘ईशा रिखी’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, असे तिने सांगितले. ईशाने सांगितले की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील. मी शोमध्ये कोणतेही बनावट रूप घेऊन जाणार नसून, स्वतः जशी आहे तशीच प्रेक्षकांना दिसणार आहे.

बादशाहसोबतच्या डिव्होर्स का झाला?

ईशा आणि बादशाह सुमारे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त होते. याच वर्षी मार्चमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते, तर जूनमध्ये त्यांच्या लग्नाची बातमी सार्वजनिक झाली होती. मात्र, काही महिन्यांतच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यामागे वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष कारणीभूत आहे का, असा प्रश्न ईशाला विचारण्यात आला. मात्र, यावेळी तिने शोमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांना सत्य स्वतः समजेल, असे सांगितले.

‘बिग बॉस २०’मध्ये कोणते स्पर्धक?

ईशासोबत एमसी मेरी कोम, आम्रपाली दुबे, स्काउट (तन्मय सिंग), काझी तौकीर, हर्ष माचारे उर्फ युंग डीएसए, माही विज, उदिती सिंग, आसिफ खान, अमन गांधी, कुशल तन्वर उर्फ गुल्लू, अरिश्फा खान, रीलिह खान आणि कनिका मान हे देखील या सीझनमध्ये झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT