babil and Irrfan Khan
babil and Irrfan Khan Instagram/@babil.i.k
मनोरंजन बातम्या

Irrfan Khan Death Anniversary: इरफान खानच्या मुलाची भावनिक पोस्ट, म्हणाला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Irrfan Khan Death Anniversary: ​​बॉलिवूड अभिनेता इरफान खानची आठवण आजही चाहत्यांना सतावते. इरफानने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट भूमिका केल्या आणि जगभरात आपले नाव कमावले. इरफानचे असे अचानक सोडून जाणे अनपेक्षित होते. इरफानचा मृत्यू झाला तेव्हा तो त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. इरफानच्या जाण्यानंतर त्याच्या कुटुंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. इरफानचा मुलगा बाबिलला त्याच्या वडिलांची रोज आठवण येते. तो त्याच्या वडिलांच्या आठवणी शेअर करत असतो. आज इरफान खानचा स्मृतिदिन असून त्याच्या जाण्याला 2 वर्षे पूर्ण होत आहेत. आज त्याचा मुलगा बाबील खूप भावूक झाला आहे. त्याने इरफानचा एक फोटो शेअर करत आपल्या वडिलांची आठवण केली आहे.

बाबिल खानने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचे वडील इरफान खान आणि आई सुतापा सिकदर दिसत आहेत. दोघेही कोणत्यातरी तलावावर बोटिंगचा आनंद घेत आहेत. हा फोटो खूपच क्यूट आहे. यासोबत मुलगा बाबिलने त्याच्या भावना चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. यामध्ये तो आपल्या वडिलांची आठवण काढत आहे. तो म्हणतो, लाईट डान्स पाहण्यासाठी तो वडिलांसोबत नॉर्वेला गेलेला दिवस त्याला आठवतोय. वडिलांनी त्या वेळी लावलेल्या अत्तराचा सुगंध त्याला आठवतो. त्या काळातला प्रत्येक क्षण त्याला आठवत असतो. वडिलांच्या आठवणीतून पुढे जाता येत नसल्याचे त्यानी या पोस्टमध्ये सांगितले.

याशिवाय त्याने आपल्या वडिलांच्या नावावर एक कविता देखील लिहिली आहे. यामध्ये तो आपल्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल बोलत आहे. बाबील सांगतो की, त्याचे वडील अजूनही त्याच्या विचारांमध्ये श्वास घेतात. त्याचे वडील शांतता शोधायचे. वडिलांची त्याला खूप आठवण येते त्याला वडिलांची प्रत्येक गोष्ट आठवते. बाबिलची ही भावनिक पोस्ट तुम्हालाही भावूक करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

SCROLL FOR NEXT