Misha Agarwal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Misha Agarwal: बर्थडेच्या २ दिवस आधीच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरचा मृत्यू

Misha Agarwal Passed Away: कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी निधन झाले आहे. 24 एप्रिल रोजी मीशाने जगाचा निरोप घेतला आणि येत्या दोन दिवसांनी तिचा वाढदिवस आहे.

Shruti Vilas Kadam

Misha Agarwal Passed Away: कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर येताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 24 एप्रिल रोजी मीशाने जगाचा निरोप घेतला आणि येत्या दोन दिवसांनी, 26 एप्रिलला तिचा 25वा वाढदिवस आहे. तिच्या अकस्मात मृत्यूने तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते पूर्णपणे हादरले आहेत.

मीशा अग्रवाल तिच्या मजेदार रील्स आणि विनोदी कंटेंटसाठी प्रसिद्ध होती. इंस्टाग्रामवर ‘The Misha Agrawal Show’ या अकाउंटवरून तिच्या निधनाची अधिकृत माहिती दिली गेली आहे. तिच्या कुटुंबीयांनी पोस्ट करत लिहिले की, "आमच्या प्रिय मीशाच्या निधनाची दुःखद बातमी शेअर करताना आमचे मन खूप जड झाले आहे. तुम्ही तिला आणि तिच्या कामाला जे प्रेम आणि आधार दिला, त्यासाठी तुमचे आभार. आम्ही अजूनही या दुःखातून सावरू शकलेलो नाही."

मीशाच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला

मीशा अग्रवालचा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही बातमी त्याच्या इंस्टाग्रामवरील ३४३ हजार फॉलोअर्ससाठी मोठा धक्का आहे. या पोस्टवर अनेक लोकप्रिय व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण काही नेटकरी या पोस्टला प्रॅन्क बोलत असून ती २ दिवसांनी याचा खुलासा करणार असे म्हणत आहे. तिच्या या पोस्टवरील कमेंटबॉक्स बंद केल्याने चाहते आणखी गोंधळले आहेत.

नेटिझन्सना वाटतोय प्रँक

अभिनेत्री शिबानी बेदीने लिहिले, 'मला यावर विश्वास बसत नाहीये.' याशिवाय सुहानी शाह आणि नगमा मिर्झाकर यांनीही मीशाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काही नेटकरी याला पब्लिसिटी स्टंट आणि प्रँक असेही म्हणत आहेत. एका नेटकाऱ्यानेने कमेंट केली मीशा २६ तारखेला येऊन सगळ्यांना धक्का देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT